शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg Politics : फडणवीसांना मुख्यमंत्री बनविण्याची स्वप्ने पाहू नयेत, नाईक यांचा राणे यांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 17:49 IST

Sindhudurg Politics : विधानसभेत १७० आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे ११७ आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनविण्याची दिवास्वप्ने त्यांनी पाहू नयेत, असा टोला शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणेंना लगावला आहे.

ठळक मुद्देफडणवीसांना मुख्यमंत्री बनविण्याची स्वप्ने पाहू नयेतनाईक यांचा राणे यांना टोला : सत्ता नसल्याने भाजप नेते पछाडलेले

कणकवली : उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करावे. मग महाराष्ट्रासाठी केंद्रातून मदत आणतो, असे वक्तव्य करणाऱ्या आमदार नितेश राणेंना मी सांगू इच्छितो की विधानसभेत १७० आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे ११७ आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनविण्याची दिवास्वप्ने त्यांनी पाहू नयेत, असा टोला शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणेंना लगावला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्राला मदत आणण्यासाठी मुळात या भूमीविषयी मनात नितांत आदर व प्रेम असावे लागते. महाराष्ट्राचा द्वेष करणारे व सत्ता नसल्यामुळे पछाडलेले भाजपचे नेते संकटाच्या व नैसर्गिक आपत्तीच्या काळात फक्त राजकारण करीत आहेत. हे राज्यातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.

महाराष्ट्रात सत्ता असेल तरच केंद्राकडून मदत मिळेल हे भाजपचे आमदार नितेश राणेंनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट केल्यामुळे नेशन फर्स्टचा मुखवटा घालून फिरणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खरा चेहरा देशातील जनतेसमोर आला आहे.महाराष्ट्र आणि केरळमध्ये तौउते चक्रीवादळाने थैमान घातलेले असताना फक्त भाजपशासित गुजरात राज्याला एक हजार कोटी रुपये मदतीचे आर्थिक पॅकेज जाहीर करून पंतप्रधान मोदींनी आपण जाहीरपणे राज्याराज्यात भेदभाव करतो याची पुष्टी दिली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या शब्दाला पक्के आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांप्रमाणे फसव्या पॅकेजची घोषणा करणे त्यांच्या स्वभावात नाही. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला निवडणुकीदरम्यान साडेसहा हजार कोटींच्या पॅकेजचे गाजर दाखविले होते. निवडणुका संपल्यानंतर त्यातला एक रुपयासुद्धा दिला नाही.मुख्यमंत्री जिल्ह्यासाठी मदत जाहीर करणारनारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॅबिनेटची बैठक आयोजित करून कोकणसाठी पाच हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्यातील पाचशे कोटी तरी मिळाले आहेत का? चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा पूर्ण आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्ह्यासाठी भरीव आर्थिक मदत जाहीर करणार आहेत. फक्त तेवढ्यावरच न थांबता वादळापासून जिल्ह्यातील किनारपट्टीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री कटिबद्ध आहेत, असेही सुशांत नाईक यांनी म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाShiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग