शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जैवविविधतेत भर; सिंधुदुर्गमध्ये सापडला अति दुर्मीळ पोवळा साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 6:53 PM

विषारी प्रजातींमध्ये मोडला जाणारा हा साप फारसा दृष्टीस पडत नाही. वरून बघितल्यानंतर मण्यारसारखा दिसणारा हा साप पोटा खालून पूर्णपणे भगवा असतो. त्याचा भगवा रंग हा तो जहाल विषारी असल्याचे द्योतक मानले जाते.

महादेव भिसेआंबोली : पश्चिम घाटामध्ये सिंधुदुर्गची जैवविविधता ही अतिशय श्रीमंत समजली जाते आणि याच श्रीमंतीची अनेक उदाहरणे आपल्यासमोर नेहमी आपण बघत आलो आहोत. काळा बिबटा असेल किंवा पट्टेरी वाघांचे अस्तित्व असेल त्यात भर म्हणून वेंगुर्ला तालुक्यातील तुळस राऊळवाडा येथील महेश राऊळ यांना कॅस्ट्रोकोरल स्नेक ज्याला मराठीमध्ये पोवळा साप असे म्हटले जाते, ही अतिशय दुर्मीळ सापाची प्रजाती आढळून आली आहे.महेश राऊळ हे गेली अनेक वर्षे भरवस्तीत आलेले साप जंगलात सोडतात ते परिसरामध्ये सर्पमित्र म्हणून सुपरिचित आहेत. त्याशिवाय भटके प्राणी असतील किंवा वन्यप्राणी, जखमी प्राणी यांच्यावर उपचार करण्यासाठीसुद्धा महेश राऊळ नेहमी अग्रस्थानी असतात. असेच काम करत असताना त्यांना घराच्या शेजारी हा साप आढळून आला.सिंधुदुर्गमध्ये दुसऱ्यांदा नोंदसाप आढळून येताच त्यांनी तत्काळ आपले सहकारी वैभव अमृसकर आणि कोकण वाइल्ड लाईफ रेस्क्यू फोरमचे अध्यक्ष अनिल गावडे यांना संपर्क केला. या तिघांनी शहानिशा केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, हा साप संपूर्ण पश्चिम घाटामध्ये प्रदेशनिष्ठ असून, अतिशय दुर्मीळ असा आहे. हा साप पाहण्यासाठी सर्पमित्र भटकत असतात किंवा हा साप दिसावा म्हणून संशोधनही केले जाते. छायाचित्रकारांनाही या सापाचे फोटो काढणे म्हणजे पर्वणीच असते. सिंधुदुर्गमध्ये केवळ दुसऱ्यांदा या सापाची नोंद झाली असल्याचे वन्यप्राणी अभ्यासक हेमंत ओगले यांनी सांगितले.असा असतो पोवळा साप....हेमंत ओगले यांनी या सापाचे संशोधन केले आहे. विषारी प्रजातींमध्ये मोडला जाणारा हा साप फारसा दृष्टीस पडत नाही. वरून बघितल्यानंतर मण्यारसारखा दिसणारा हा साप पोटा खालून पूर्णपणे भगवा असतो. त्याचा भगवा रंग हा तो जहाल विषारी असल्याचे द्योतक मानले जाते. दगडाखाली आणि पालापाचोळ्याखाली हा साप नेहमी राहतो. त्याचे भक्ष्य छोटे बेडूक, सरडे, पाली, गांडूळ इत्यादी आहे. साधारणपणे दोन ते अडीच फुटापर्यंत या सापाची लांबी असते. करंगळी एवढा जाड असतो. याच्या बरोबर डोक्यावर भगवी जाड रेषा असते. हा साप घाबरला तर आपली शेपटी गोल करून ती जमिनीवर आपटून आपल्या जवळ येऊ नका, असा इशारा देत असतो.सिंधुदुर्गची जैवविविधता नकाशावर झळकणारहा साप महेश राऊळ यांना आढळल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मानद वन्यजीवरक्षक काका भिसे यांच्याशीही संपर्क केला. या सापाविषयी माहिती घेतली असता महेश राऊळ, अनिल गावडे व वैभव अमृतकर यांनी या सापाची नोंद त्यांच्या रजिस्टरमध्ये केली असून, लवकरच या सापाच्या अधिवासाबद्दल व सापाच्या आढळाबाबत छोटेखानी शोधनिबंध लिहिणार असल्याचे सांगितले आहे. या सापाच्या आढळामुळे पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्याची जैवविविधता जगाच्या समोर प्रकाशझोतात येणार असल्याचे यावेळी फोरमचे अध्यक्ष अनिल गावडे यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गsnakeसाप