शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली 'मुंबईकर'ची व्याख्या; "बाहेरून आला म्हणून काय झाले..." 
2
मोठी बातमी! तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड; ममता बॅनर्जी पोहोचल्या, फाईल्स ताब्यात घेतल्या...
3
१ फेब्रुवारी हीच बजेट सादरीकरणाची तारीख का निवडली? भारतीय अर्थसंकल्पाचा रंजक इतिहास
4
टीम इंडियातून डावललेला पुणेकर ऋतुराज गायकवाड ठरला जगात भारी! २० वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडला
5
५ वर्षांचं प्रेम, लग्नानंतर बायकोला शिकवलं, पोलीस अधिकारी बनवलं; आता नवऱ्यावरच केला आरोप
6
अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक अखेर भाजपात, काँग्रेसनं केली होती निलंबनाची कारवाई
7
"मराठीत माधुरी दीक्षित नाहीये...", असं का म्हणाले रवी जाधव? 'फुलवरा' सिनेमाशी आहे कनेक्शन
8
४ राजयोगात २०२६ची पहिली कालाष्टमी: ९ राशींवर महादेव-लक्ष्मी कृपा, चौपट लाभ; कल्याण-मंगल योग!
9
घसरत्या बाजारातही रॉकेट बनलाय हा स्मॉलकॅप शेअर; ५७००% पेक्षाही अधिक आलीये तेजी
10
भाजप शिवसेनेला संपवणार? 'फोडाफोडी'वर एकनाथ शिंदेंचे रोखठोक उत्तर, म्हणाले; "आम्ही घाबरत नाही"
11
रस्त्यात जखमी दुचाकीस्वाराला पाहताच अजित पवारांनी केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक!
12
Madhav Gadgil: कोकणातील पर्यावरणीय संघर्षाला नवी दिशा देणारा मार्गदर्शक हरपला!
13
१० मिनिटांच्या डिलिव्हरीवर गिग वर्कर्सचा आक्षेप; क्विक कॉमर्स कंपन्यांचे धाबे दणाणले, काय आहे मागणी?
14
रोहित शर्माची पत्नीने रितिका सजदेहने मुंबईतील पॉश एरियात घेतला आलिशान फ्लॅट, किंमत किती?
15
फक्त फोन जवळ नेला अन् पैसे उडाले! 'टॅप-टू-पे' वापरताय तर ही बातमी वाचाच; नाहीतर होईल मोठं नुकसान
16
Vijay Hazare Trophy : हार्दिक पांड्याची वादळी खेळी! ‘बडे मियाँ’च्या कॅप्टन्सीत ‘छोटे मियाँ’चा धमाका!
17
Akola Municipal Election 2026: कोणाला पुन्हा संधी? माजी महापौर, तीन माजी महापौरांचे कुटुंबीय आजमावणार नशीब!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले, एका झटक्यात चांदी ₹१२,२२५ नं स्वस्त; Gold च्या किंमतीत किती घसरण, पाहा
19
वडिलांना वाचवण्यासाठी लेकीने बिबट्याशी दोन हात केले, उसाच्या तुकड्याने फोडून पळवून लावले
20
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहरातील पेपर केला सोपा; २० जागांवर युतीचे नगरसेवक बिनविरोध
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात पावसाची उघडीप; पूरस्थिती पूर्वपदावर, कुडाळ तालुक्यात सर्वाधिक पाऊस

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 21, 2023 19:19 IST

सिंधुदुर्गनगरी : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेली पावसाची संततधार शुक्रवारी कमी झाली. पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत होत्या. संततधार ...

सिंधुदुर्गनगरी : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेली पावसाची संततधार शुक्रवारी कमी झाली. पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत होत्या. संततधार कमी झाल्याने पूरपरिस्थिती नियंत्रणात होती. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात शुक्रवार सकाळपर्यंत कुडाळ तालुक्यात सर्वाधिक २०७.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी १५०.२ मि.मी. पाऊस झाला असून, एकूण सरासरी १६४१ मि.मी. पाऊस झाला आहे.मुसळधार पावसाने बुधवार आणि गुरुवारी सिंधुदुर्गला झोडपून काढले. परिणामी अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. कुडाळमध्ये भंगसाळ नदीला आलेल्या पुराचे पाणी शहरातील आंबेडकरनगरामध्ये घुसले होते, तर तेरेखोल नदीला आलेल्या पुराचे पाणी बांदा आळवाडीतील मच्छीमार्केट परिसरात घुसले होते. सतत पडणाऱ्या पावसामुळे भुईबावडा घाटातही छोट्या-मोठ्या दरडी कोसळत होत्या. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. ग्रामीण भागातील छोटे-मोठे कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतूकही ठप्प होती.धरणांच्या पाणीसाठ्यात वाढतिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये ३०९.७९२ द.ल.घ.मी. पाणीसाठा असून, धरण ६९.२५ टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघुपाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये आता पाणीसाठा वाढला आहे, तर तिलारी नदी ३८.६००, कर्ली नदीची ९ मीटर, वाघोटन नदीची ६ मीटर, गद नदीची ३५.२०० तर तेरेखोल नदीची पातळी ६ मीटरवर आहे. नद्या इशारा पातळीपर्यंत भरल्या आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस