शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

संपली मोहीम, संपली जागृती... मांडवीला अस्वच्छतेचा फेरा

By admin | Updated: November 9, 2014 23:37 IST

तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी जिल्ह्यातील किनारे स्वच्छता मोहीम जोरदारपणे राबविली होती़

रत्नागिरी : भारत स्वच्छता अभियान राबविण्यात येत असतानाच मांडवी किनारपट्टीवर कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेली प्लास्टिकची बॅरल तुडुंब भरली आहेत. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तेथे फिरायला येणाऱ्या लोकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़  तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी जिल्ह्यातील किनारे स्वच्छता मोहीम जोरदारपणे राबविली होती़ जिल्हाधिकारीऱ्यांनी भाट्ये, आरे-वारे, मांडवी किनाऱ्यावर दारु पिण्यासाठी बसलेल्या पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारला होता़ या उपक्रमामध्ये शाळा, कॉलेज, खासगी कंपन्या व लोकांना सहभाग करुन किनारे स्वच्छता मोहीम राबविली होती़ त्याचवेळी भाट्ये किनारा फिनोलेक्स कंपनी आणि मांडवी किनारा अल्ट्राटेक कंपनीने स्वच्छ करण्याची जबाबदारी घेतली होती़  या स्वच्छतेच्या वेळी मांडवी किनाऱ्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांनी कचरा करु नये, यासाठी नऊ ठिकाणी प्लास्टिकची बॅरल ठेवण्यात आली होती़ मांडवी किनारा गतवर्षी राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेच्या वेळी चकाचक करण्यात आला होता़ मात्र, त्यानंतर याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. या किनाऱ्याची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत नसल्याने तेथे दारुच्या बाटल्या, प्लास्टिक किनाऱ्यावर कित्येक दिवस पडलेले असते़ कचरा टाकण्यासाठी लावण्यात येणारी प्लास्टिक बॅरल गेल्या कित्येक दिवसांपासून कचऱ्याने तुडुंब भरलेली आहेत़ या बॅरलमधून कचरा वेळीच साफ केला जात नसल्याने दुर्गंधी पसरते. एक बॅरल तर वाहून गेले असून, ते किनाऱ्यावर आडवे झाले आहे़ येथील मारुती मंदिरशेजारीच अल्ट्राटेक कंपनीच्या फलकाला लागून असलेले बॅरल कचऱ्याने भरले असून, किनाऱ्यावर कचरा पसरला आहे. हा कचरा वेळीच उचलला जात नसल्याने अस्ताव्यस्त पसरलेला आहे. एकूणच किनारपट्टीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे़ एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असताना दुसरीकडे कचऱ्याने भरलेली बॅरल साफ करण्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले जात आहे़ त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ (शहर वार्ताहर)मांडवी किनाऱ्यावर प्लास्टिक पिशव्या, दारुच्या बाटल्या फेकल्या जातात़ हा कचरा वेळीच साफ करण्यासाठी संबंधितांना वेळ मिळत नाही़ त्यामुळे अमावास्या, पौर्णिमेच्या दिवशी उधाणाच्या भरती-ओहोटीची वाट पाहावी लागते. याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे़