मत्सर त्यागामुळे प्रगती शक्य
By Admin | Updated: January 2, 2015 23:58 IST2015-01-02T22:57:19+5:302015-01-02T23:58:55+5:30
रत्नागिरीत महोत्सव : आफळेबुवांच्या कीर्तनात रसिक दंग

मत्सर त्यागामुळे प्रगती शक्य
रत्नागिरी : माणसानेङ्कमद, मत्सराचा त्याग केला तरच प्रगती होते, असे सांगितले. शस्त्रांचा घाव बुजेल, पण कटू शब्दांनी झालेली जखम बुजत नाही, असे सांगताना द्रोण आणि द्रुपद यांचे उदाहरण दिले. केवळ कटू बोलण्यामुळे एकेकाळचे हे जीवाभावाचे मित्र परस्परांचे शत्रू बनल्याचे सांगून ‘देङ्कमत्सरे सांडिला स्वार्थ बुद्धी’ या समर्थ रामदासांच्या श्लोकाचा अर्थ राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे यांनी समजावून सांगितला.
कीर्तनसंध्या संस्था आयोजित कीर्तन ङ्कमहोत्सवात आफळेबुवा पहिल्या दिवशी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनंतरङ्कमराठी सत्ता २७ वर्षे टिकवून ठेवण्यात शंभूराजे, राजारामङ्कमहाराज, ताराबाई, येसूबाई यांनी जिद्द, चिकाटी दाखवली. त्यांच्या या सामर्थ्याला काय नाव द्यावे? मराठी साम्राज्याकडे वाटचाल करताना मराठ्यांनी प्रचंड कष्ट घेतले. पण इतिहासात त्यांच्या या जिद्दीवर फारसे लेखन झालेले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आफळे म्हणाले, अफझलखानाच्या ङ्खफौजेला संताजी आणि धनाजी या जोडगोळीने सळो की पळो करून सोडले. मुघलांच्या चार-पाच लाख सैनिकांवर गनिमी हल्ले करून त्यांनी मुघलांचे एकसंध कार्य राहू दिले नाही. त्यांची रसद मारायची, घोडे, हत्ती ताब्यात घ्यायचे, असा पराक्रम करत होते. नेमाजी शिंंदे, रामचंद्रपंत अमात्य आणि संताजी, धनाजींवर इतिहासात जास्त वर्णन झाले नाही. घोडेसुद्धा पाणी पिताना बिथरले की, मुघल सैनिकही घाबरायचे आणि पाण्यात संताजी, धनाजी दिसले का? असे विचारायचे. ‘धूळ उडे अन् अंबरी, चंद्रालाही डाग पडे, अरे वाजल्या कुठे जर टापा, धुरळ्याची दिसली छाया, छावणीत गोंधळ व्हावा, आया आया संताजी आया’ हे पद ऐकवून वाहवा मिळवली. मराठी राज्य टिकवण्यासाठी त्यांनी मुघलांना जेरीस आणल्याचे सांगितले.
एकीकडून मुघलांचीङ्खफौज आली आणि मागच्या बाजूने महाराजांनी पलायन केले.ङ्कमोहीम फत्ते झाल्यावर बल्लाळ कोठडीत परतले. तत्पूर्वी धर्मांतराच्या सक्तीमुळे बहिरोजीने विष प्राशन केले होते. त्याला तसेच घेऊन बल्लाळ परतले. मराठी साम्राज्यासाठी बल्लाळांनी स्वत:चे वडील, बहीण आणिङ्कमुलगा गमावला. त्यांच्याङ्कमुत्सद्दीपणाला सलाम असे त्यांनी सांगितले.
आफळेबुवांना तबलासाथ मिलिंंद टिकेकर, पखवाजसाथ राजा केळकर, आॅर्गनसाथ विलास हर्षे आणि आफळे यांचे सुुपुत्र वज्रांग यांनी तालवाद्यसाथ केली. या महोत्सवाला कीर्तनप्रेमीनी उत्तम प्रतिसाद दिला. (प्रतिनिधी)