कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, रेल्वे वाहतूक विस्कळीत
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 7, 2022 12:20 IST2022-12-07T12:07:29+5:302022-12-07T12:20:29+5:30
वैभववाडी : इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कोकण कन्या एक्स्प्रेस कोकिसरे दरम्यान बंद पडली. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली ...

कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, रेल्वे वाहतूक विस्कळीत
वैभववाडी : इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कोकण कन्या एक्स्प्रेस कोकिसरे दरम्यान बंद पडली. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही घटना आज, बुधवारी सकाळी आठच्या दरम्यान घडली.
मुंबईहून गोव्याकडे कोकण कन्या एक्स्प्रेस जात असताना कोकिसरे रेल्वे फाटका पासून काही अंतरावर अचानक बंद पडली. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ट्रेन बंद पडली अशी माहिती प्राप्त झाली आहे. रेल्वे बंद पडल्याने या मार्गावरील सेवा विस्कळीत झाली.
राजापूर स्टेशन वरून नवीन इंजिन उपलब्ध करण्यात आले आहे. कोकण कन्या परत वैभववाडी प्लॅटफॉर्मवर नेण्यात येत आहे. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.