शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मालवणात अंमली पदार्थांचे रॅकेट सक्रिय, पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 17:39 IST

मालवण शहरात सध्या अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. यामध्ये प्रामुख्याने १५ ते २५ वयोगटातील युवक गुंतलेले असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मालवणातील हे युवक अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन झाले असून मागणी नुसार अंमली पदार्थांची पाकिटे ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचा छुपा गैर धंदाही वाढीस लागला असून यामध्येही मालवणातील बरेच युवक सहभागी असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देमालवणात अंमली पदार्थांचे रॅकेट सक्रिय, पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा अल्पवयीन मुले अंमली पदार्थाच्या विळख्यात

मालवण : मालवण शहरात सध्या अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. यामध्ये प्रामुख्याने १५ ते २५ वयोगटातील युवक गुंतलेले असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मालवणातील हे युवक अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन झाले असून मागणी नुसार अंमली पदार्थांची पाकिटे ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचा छुपा गैर धंदाही वाढीस लागला असून यामध्येही मालवणातील बरेच युवक सहभागी असल्याची चर्चा आहे.मालवणसह वायरी तारकर्ली देवबाग या किनारी भागात पर्यटन बहरत आहे. मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांबरोबर मोठ्या प्रमाणात पैसाही येत आहे. पर्यटन व्यवसायात मोठ्या प्रमाणावर युवक व तरुण वर्ग गुंतलेला असल्याने हा पैसा त्यांच्या हातात खेळत आहे.

हातात येणाऱ्या पैशाचे कोणतेही नियोजन नसल्याने ही युवा मंडळी पैशाचा वापर मौज मजा करण्यात उडवत आहे. यातूनच मद्यपान, धूम्रपान, गांजा, कोकेन व ड्रग्ज आदी अंमली पदार्थांच्या युवक आहारी गेले आहेत. त्याबरोबरच अवैध जुगार अड्डेही वाढले आहेत. अनेक ठिकाणी खुलेआम अंमली पदार्थांचे सेवन करत आहेत, असे बोलले जात आहे.युवकांची अंमली पदार्थांची गरज भागविणारे मोठे रॅकेट सध्या मालवण शहरासह वायरी, तारकर्ली देवबाग याभागात सक्रिय असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. यातील ड्रग्ज माफियांनी १५ ते २५ या वयोगटातील युवकांना आपले लक्ष्य बनवून त्यांना अंमली पदार्थ पुरवितानाच अंमली पदार्थांच्या विरतरणासाठी या युवकांना आपल्या जाळ्यात ओढले आहे असे बोलले जात आहे.

गरजूंना अंमली पदार्थांची पाकिटे या युवकांमार्फत पोच केली जात आहेत. तसेच मालवण, वायरी तारकर्ली, देवबाग याभागात येणाऱ्या पर्यटकांच्या मागणीनुसार त्यांनाही अंमली पदार्थ पोच करण्याचे काम हे युवक करत असल्याची चर्चा आहे. या अवैध धंद्यामुळे युवक ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहेत. पोलीस याचा माग काढून ठोस कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस