बांदा-पानवळमध्ये विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

By Admin | Updated: June 19, 2014 01:14 IST2014-06-19T01:01:09+5:302014-06-19T01:14:32+5:30

घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली

Electricity deaths in Banda-Pannal death | बांदा-पानवळमध्ये विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

बांदा-पानवळमध्ये विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

बांदा : बांदा-पानवळ येथे बागेत काम करीत असताना विद्युतभारीत तारांचा स्पर्श झाल्याने शांताराम विठू आईर (वय ६२, रा. मोरगाव- गावठणवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
याबाबतची माहिती बागेचे मालक वैभव डेगवेकर यांनी बांदा पोलिसांत दिली. आईर हे आज नेहमीप्रमाणे ते मोरगाव येथून पानवळ येथे बागायतीच्या कामासाठी आले होते. दुपार होऊनही ते बागायतीतून घरी जेवणासाठी न आल्याने वैभव डेगवेकर हे आईर यांना बोलविण्यासाठी गेले असता बागायतीत त्यांचे फावडे व कुदळ आढळले. त्याच्या शेजारीच शेतविहिरीलगत ते मृतावस्थेत आढळले. विद्युतभारीत तारांना स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. बांदा पोलिसांसह सरपंच शीतल राऊळ, भाऊ वळंजू, माजी सरपंच गुरुदास धारगळकर यांच्यासह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शांताराम आईर यांच्या पश्चात पत्नी, चार विवाहित मुली असा परिवार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Electricity deaths in Banda-Pannal death