शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Sindhudurg: वीज तारा चोरणारे २४ तासांत गजाआड, पाच संशयितांसह एक टेम्पोही ताब्यात 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 30, 2023 17:30 IST

देवगड ( सिंधुदुर्ग ) : मिठबांव येथील वीजवितरणची १० हजार रुपये किमतीची अॅल्युमिनियम वायर चोरट्यांनी चोरून नेली होती. ही ...

देवगड (सिंधुदुर्ग) : मिठबांव येथील वीजवितरणची १० हजार रुपये किमतीची अॅल्युमिनियम वायर चोरट्यांनी चोरून नेली होती. ही घटना १६ ऑगस्ट रोजी दुपारी १:३० ते २७ ऑगस्ट रोजी दुपारी १:३० वा. या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासांत पोलिसांनी पाच संशयितांसह एक टेम्पोही ताब्यात घेतला आहे.या चोरीच्या प्रकरणात सागर भिकाजी शिंगाडे (२६ रा. वरेरी), बिपीन सुरेश चव्हाण (३७, रा. कुणकेश्वर), शाहरूख आयुब खान (२५, रा. मळई, जामसंडे), जुनैद कय्युम होलसेकर (१९, रा. देवगड किल्ला) आणि मोहनलाल सुरजबली निसाद (३७, रा. देवगड सातपायरी) या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिठबांव गजबार येथील वीज खांबावरील सुमारे १६८० मीटर लांबीची १० हजार रुपये किमतीची ॲल्युमिनियम वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तसेच डीटीसी बॉक्स पेटीतील फ्यूज काढून फोडून नुकसान केले. याबाबत मिठबांव येथील वीजवितरणचे कर्मचारी संदीप भागोजी गोसावी (रा. पडेल) यांनी देवगड पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे व पोलिस उपनिरीक्षक एस. एल. कदम यांनी भेट दिली. दरम्यान, या चोरीप्रकरणी पोलिसांनी तीन संशयित युवकांना ताब्यात घेतले आहे. तसेच वायर आणण्यासाठी वापरलेला टेम्पोही ताब्यात घेतला असून, तपास पोलिस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.२४ तासांतच चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या मिठबांव येथील वीजवितरणच्या तारांची चोरी करणाऱ्या पाच आरोपींच्या मुसक्या २४ तासांच्या आत आवळून त्यांना गजाआड करण्याची कौतुकास्पद कामगिरी देवगड पोलिसांनी केली आहे. पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुधीर कदम,  हवालदार अमित हळदणकर, शिपाई नीलेश पाटील, विशाल वैजल, स्वप्नील ठोंबरे यांनी गुन्ह्याचा कसून तपास करून देवगड शहर व परिसरातील गावातील चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यासोबत चोरीस गेलेला मुद्देमाल ही जप्त केला आहे

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी