शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे चुरस वाढली--वार्तापत्र वेंगुर्ले तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 21:52 IST

वेंगुर्ले : तालुक्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. थेट सरपंच निवडीमुळे इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे.

ठळक मुद्देदोन ग्रामपंचायती बिनविरोध उमेदवारांकडून व्यक्तिगत गाठीभेटींवर भर

सावळाराम भराडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवेंगुर्ले : तालुक्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. थेट सरपंच निवडीमुळे इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत दोन ग्रामपंचायतींच्या सरपंचांची बिनविरोध निवड झाल्याने उर्वरित २१ ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीत चुरस निर्माण झाली आहे.

सर्वच पक्ष रिंगणात उभे ठाकल्याने कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. सध्या तरी उमेदवारांनी व्यक्तिगत गाठीभेटींबरोबरच घरोघरी प्रचार करण्याच्या कामास सुरुवात केली असून कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.वेंगुर्ले तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत केळूस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किशोर बापू केळुसकर, तर पाल गावच्या सरपंचपदी श्रीकांत राजाराम मेस्त्री हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित २१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी ८० उमेदवार रिंगणात असून यामध्ये नऊ ग्रामपंचायतीत दुरंगी, पाच ग्रामपंचायतीत तिरंगी, दोन ग्रामपंचायतींमध्ये चौरंगी, तर पाच ग्रामपंचायतींमध्ये बहुरंगी लढत होणार आहे. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायतींवर पुरुष सरपंच, तर ९ ग्रामपंचायतींवर महिला राज दिसणार आहे.

वेतोरे, वजराट, म्हापण, मेढा, कोचरा, चिपी, आसोली, आडेली, कुशेवाडा या नऊ ग्रामपंचायतींत दुरंगी लढत पहावयास मिळणार आहे.यात वेतोरे ग्रामपंचायतीमध्ये राधिका गावडे व स्नेहलता हळदणकर, वजराठमध्ये महेश राणे व सूर्यकांत परब, म्हापणमध्ये श्यामसुंदर ठाकूर व श्रीकृष्णा ठाकूर, मेढा येथे भारती धुरी व किशोरी टिकम, कोचरा येथे साची फणसेकर व कीर्ती गावडे, चिपीमध्ये साईनाथ माडये व गणेश तारी, आसोलीत सेजल धुरी व रिया कुडव, आडेली येथे प्रीती मांजरेकर व समिधा कुडाळकर, तर कुशेवाडा ग्रामपंचायतीत स्नेहा राऊळ व सुरेखा तेली आमने-सामने ठाकलेआहेत.बहुरंगी लढतीची शक्यताउभादांडा, शिरोडा, रेडी, परबवाडा, दाभोली या पाच ग्रामपंचायतींत बहुरंगी लढत पहावयास मिळणार आहे. उभादांडा ग्रामपंचायतीमध्ये देवेंद्र डिचोलकर, इलियास फर्नांडिस, गजानन नवार, रमेश नार्वेकर, बाबी नवार, ज्ञानदेव साळगावकर व हेमंत गिरप हे सात उमेदवार सरपंचपदासाठी नशीब आजमावणार आहेत.शिरोडा ग्रामपंचायतीतून प्रमोद नाईक, विजय नाईक, डेविड अल्फोन्सो, शिवराम गावडे, मनोज उगवेकर, प्रवीण धानजी, मयुरेश शिरोडकर, अमोल परब, दत्ताराम हाडये हे नऊ उमेदवार रिंगणात आहेत.रेडी ग्रामपंचायतीमध्ये अभिजित राणे, राजेंद्र्र कांबळी, पृथ्वीराज राणे, रामचंद्र्र कनयाळकर, गुणाजी मांजरेकर, रामसिंग राणे, बाळकृष्ण राणे, सुरेखा कांबळी व देविदास मांजरेकर हे नऊ उमेदवार रिंगणात आहेत.परबवाडा ग्रामपंचायतीमधून कृष्णा टेमकर, श्रीकृष्ण तेरेखोलकर, विष्णू परब, समीर परब, विवेक नाईक, संजय परब, राधाकृष्ण गवंडे, सुंदर परब हे आठ उमेदवार सरपंचपदासाठी निवडणूक आखाड्यात आहेत, तर दाभोली ग्रामपंचायतीमधून नरेश बोवलेकर, गणपत राऊळ, प्रसाद हळदणकर, उदय गोवेकर, लवू शिरोडकर हे पाच उमेदवार रिंगणात आहेत.तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या २२१ जागांमधून ७१ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित सदस्यांच्या १५० जागांसाठी ३४२ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, पुरुष मतदार २२,२४६ व स्त्री मतदार २१,९२६ मिळून ४४,१७२ मतदार ग्रामपंचायतींच्या उमेदवारांचे भवितव्य ठरविणारआहेत.तिरंगी लढत रंगणारपरूळेबाजार, पालकरवाडी, होडावडा, भोगवे व अणसूर या पाच ग्रामपंचायतींत तिरंगी लढत आहे. परूळेबाजार ग्रामपंचायतीमध्ये मुक्ता परुळेकर, श्वेता चव्हाण व रेखा परुळेकर, पालकरवाडी येथे विकास अणसूरकर, संदीप चिचकर व नंदकिशोर तळकर, होडावडा येथे अदिती नाईक, विनया दळवी व रूपल परब, भोगवे येथे सुनील राऊत, रूपेश मुंडये व चेतन सामंत, अणसूरमध्ये अन्विता गावडे, संयमी गावडे व साक्षी गावडे अशा तिरंगी लढती होणार आहेत.मठ व तुळस या दोन ग्रामपंचायतींत चौरंगी लढत होणार आहे. यामध्ये तुळस ग्रामपंचायतीमधून संदीप पेडणेकर, कृष्णा तुळसकर, शंकर घारे व महादेव तांडेल, तर मठ ग्रामपंचायतीमधून अजित नाईक, नित्यानंद शेणई, तुळशीदास ठाकूर व दत्ताजी गुरव रिंगणात आहेत.