शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

 निर्भय वातावरणात निवडणूक पार पडावी : सहारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 1:46 PM

निर्भय वातावरणात ग्रामपंचायत निवडणूक पार पाडण्याची अधिकारी वर्गाने दक्षता घ्यावी अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी कुडाळ येथील एम.आय.डी.सी. विश्रामगृहावर आयोजित अधिकारीवर्गांच्या बैठकीत केल्या.

ठळक मुद्दे16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 325 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी आढावा कुडाळ येथील अधिकारीवर्गांच्या बैठकीत सूचना

सिंधुदुर्गनगरी दि. 10 : निरपेक्ष व निर्भय वातावरणात ग्रामपंचायत निवडणूक पार पाडण्याची अधिकारी वर्गाने दक्षता घ्यावी अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी कुडाळ येथील एम.आय.डी.सी. विश्रामगृहावर आयोजित अधिकारीवर्गांच्या बैठकीत केल्या. यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने हेही उपस्थित होते.जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलिस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक प्रदीप वाळुंजकर, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी विजय जोशी, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार उपस्थित यावेळी होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 325 ग्रामपंचायतींच्या निवडणूक संदर्भात सविस्तर आढावा या बैठकीत आयुक्त सहारिया यांनी घेतला. ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आचार संहितेचे कोटेकोरपणे पालन व्हावे. मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुलभतेने व शांततेत पार पडावी. 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान आहे.

या दिवशी अचानक पाऊस झाला तर कोणती दक्षता घ्यावी, मतदान केंद्रावर अशा वेळी मतदारांच्या रांगा असतील तर निवाऱ्यासाठी स्वतंत्र व्यवस्थेची सुविधा तयार ठेवावी, मतदान साहित्य व अधिकारी/ कर्मचारी यांची वाहतुक व्यवस्था, पोलिस बंदोबस्त, या बाबत त्यांनी यावेळी सविस्तर सूचना दिल्या.

आतापर्यंत झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन सागरी मार्ग, जिल्ह्यातील जलमार्ग, रस्ते, रेल्वे या मार्गावर गस्तीसाठी विशेष भरारी पथकांची नियुक्ती करावी अशी सुचना करुन आयुक्त सहारिया यांनी या बैठकीत मतमोजणी प्रक्रियेच्या व्यवस्थेचाही सविस्तर आढावा घेतला.सिंगल विंडो सिस्टीम अधिक कार्यक्षम करावी अशी सुचना करुन राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी सर्व परवानग्या एकाच ठिकाणी वेळेवर मिळाव्यात, व्होटर स्लिप वितरण विहित वेळेत पूर्ण करावे, 16 ऑक्टोबर रोजी मतदानादिवशी पाऊस आलाच तर याबाबत व्यवस्थेचे नियोजन करावे, जाहीर प्रचाराची मुदत 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत राहील असे स्पष्ट केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 1029 मतदान केंद्रे आहेत. पुरुष मतदार- 2 लक्ष 9 हजार 441 तर स्त्री मतदार - 2 लक्ष 10 हजार 737 असे एकूण 4 लक्ष 20 हजार 179 मतदार आहेत. प्रत्येक तालुक्यात दोन भरारी पथके कर्यरत राहणार आहेत.

जिल्ह्यातील 29 ग्रामपंचायतीमधील सरपंच व सदस्य पूर्णत: बिनविरोध निवडून आले आहेत. सरपंच पदासाठी 1238 नामनिर्देशन पत्र दाखल पैकी 1215 वैध, 23 अवैध व 332 माघार. सरपंच पदासाठी एकूण 46 बिनविरोध निवड तर 837 उमेदवार रिंगणात आहेत.

ग्रामपंचायत सदस्य पदासाठी एकूण 5 हजार 176 नामनिर्देशनपत्र दाखल. 5 हजार 71 वैध तर 105 नामनिर्देशनपत्र अवैध 620 माघार. सदस्य पदासाठी 926 बिनविरोध तर तीन हजार 525 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी पॉवर पॉईंट प्रेन्झेटेशनच्या माध्यमातून दिली.जिल्हा पोलिस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत 101 तर पोलिस विभागाकडून एक गुन्हा आचारसंहिता कालावधीत झाला असल्याचे यावेळी सांगितले.

44 लक्ष 56 हजार रुपयांची अनधिकृत दारु जप्त करण्यात आली. वाहतुक करणारी तीन वाहने पकडण्यात आली. 101 परवाना धारक शस्त्रे जमा करण्यात आली. जिल्ह्यातील वीस तपासणी नाके, 43 सेक्टरमध्ये पोलिस बंदोबस्त, मतदान केंद्रावरील पोलिस बंदोबस्त याची सविस्तर माहिती यावेळी दिली.बैठकीस उपविभागीय अधिकारी निता शिंदे, सुशात खांडेकर, विकास सुर्यवंशी, पोलिस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस, पद्मा चव्हाण तसेच सर्व तहलिसदार उपस्थित होते.