बांदा : दुचाकीवरुन कोसळून गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचा मृत्यू झाला. लक्ष्मी नारायण माळकर (वय- ६० रा. पाडलोस) असे मृत महिलेचे नाव आहे. शेर्ले येथे बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. जखमी महिलेवर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन तिला अधिक उपचासाठी गोवा बांबोळी येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. लक्ष्मी माळकर या दुचाकीच्या मागे बसल्या होत्या. भरधाव वेगामुळे त्या गाडीवर खाली कोसळल्या. अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ .गजानन सारंग यांनी प्राथमिक उपचार केले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा- बांबोळी येथे हलविण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
Sindhudurg: दुचाकीवरून पडून वृद्धेचा मृत्यू, शेर्ले येथे अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 16:01 IST