शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

अपघातात मालवणमधील आठ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 16:53 IST

Accident Highway Sindhudurg- मुंबई - गोवा महामार्गावर खारेपाटणपासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे या घाटीत एका अवघड वळणावर कार (एम. एच. 0७ पी. ९९७७) या मालवण येथून आलेल्या व चिपळूण येथे जाणाऱ्या चारचाकी वाहनाला पाठीमागून येणाऱ्या मोठ्या अवजड मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. यामुळे अपघातात चारचाकी गाडीतील वाहनचालकासह एकूण ८ जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी दुपारी १२ च्या दरम्यान घडला.

ठळक मुद्देअपघातात मालवणमधील आठ जण जखमी खारेपाटण नडगिवे घाटीतील घटना : कारला ट्रकची मागाहून धडक

खारेपाटण : मुंबई - गोवा महामार्गावर खारेपाटणपासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे या घाटीत एका अवघड वळणावर कार (एम. एच. 0७ पी. ९९७७) या मालवण येथून आलेल्या व चिपळूण येथे जाणाऱ्या चारचाकी वाहनाला पाठीमागून येणाऱ्या मोठ्या अवजड मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. यामुळे अपघातात चारचाकी गाडीतील वाहनचालकासह एकूण ८ जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी दुपारी १२ च्या दरम्यान घडला.अपघातातील जखमी व्यक्तींवर खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तातडीने उपचार करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये पावनी नीलकंठ मालंडकर (१३), साईश मोहन कुसवेकर (१४), वैशाली गजानन कुडाळी (४८), दीपक धर्माजी जाधव (४९), दिग्गज दीपक जाधव १४), हिमानी जगदीश येरम (१५), ईशान नितीन वेंगुर्लेकर (१३), रंजन रानोजी साठे -वाहनचालक (२५, सर्व राहणार मालवण) यांचा समावेश आहे.मालवण टेबल टेनिस ॲकॅडमी येथून विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित युथ गेमसाठी चिपळूण डेरवण येथे प्रशिक्षकासह मुले कारने चालली होती. दरम्यान, महामार्गावर नडगिवे या गावी जिल्हा परिषद केंद्र शाळा नं. १च्या समोर एकदिशा मार्गावर गोवा येथून आलेला व दमन येथे अवजड माल घेऊन जाणारा ट्रकचा (क्र. जीजे २७, एक्स ५८०४) ब्रेक निकामी झाल्याने वाहनचालक जितेंद्र यादव (२१, रा. उत्तरप्रदेश -प्रतापगड) याने पुढे चालणाऱ्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे गाडी उलटी होऊन अपघात झाला.अपघात एवढा भीषण होता की गाडीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही; परंतु चारचाकी गाडीतील ८ व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या.

चालकाच्या हाताला दुखापत झाली, तर एका मुलीच्या डोक्याला मार बसला. अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, उपसरपंच इस्माईल मुकादम, सदस्य महेंद्र गुरव, भाऊ राणे, बबन तेली यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातात जखमी व्यक्तींना तातडीने खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यास मदत केली. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.मुंबई - गोवा महामार्गावर खारेपाटणपासून जवळ असलेल्या नडगिवे घाटीत चारचाकी वाहनाचा अपघात झाला. (छाया : संतोष पाटणकर )

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग