असलदे येथे सापडला आठ फूट लांबीचा अजगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 17:43 IST2018-11-19T17:41:34+5:302018-11-19T17:43:11+5:30
असलदे येथील रानात महाकाय अजगर सापडला. सुमारे आठ फूट लांबीच्या या अजगराला सर्पमित्रांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले

असलदे येथे सापडला आठ फूट लांबीचा अजगर
तळेरे : असलदे येथील रानात महाकाय अजगर सापडला. सुमारे आठ फूट लांबीच्या या अजगराला सर्पमित्रांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
असलदे येथील रानात महाकाय अजगर असल्याची माहिती चंदू शिंदे यांनी दिली. त्यानंतर तत्काळ सर्पमित्र सदानंद पवार व सहकरी सिध्देश मेस्त्री, निखील आचरेकर, निलेश मेस्त्री, अमित इंदप, उत्तम सावंत, संकेत पेडणेकर यांनी त्या अजगाराला पकडले.
आठ फूट लांब असलेल्या या अजगराचे वजन ४० ते ५० किलो होते. त्याला पकडल्यानंतर बघण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
असलदे येथील रानात सुमारे आठ फूट लांबीच्या अजगराला सर्पमित्रांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. (छायाचित्र : निकेत पावसकर)