शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सिंधुदुर्गातील शाळा बंद करण्याचा शिक्षणमंत्र्यांचा घाट, विनायक राऊतांचा आरोप

By सुधीर राणे | Updated: June 10, 2023 13:56 IST

जिल्ह्यातील १२० प्राथमिक शाळा शिक्षकाविना

कणकवली: राज्य शासनाने शिक्षणाच्या बाबतीत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यावर सुड उगविण्याचे धोरण अवलंबिले आहे.  राज्याचे शिक्षण मंत्री हे सिंधुदुर्गातील असतानाही त्यांनी येथील शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. असा आरोप करतानाच राज्य सरकारच्या चुकीच्या प्राथमिक शिक्षक बदली धोरणामुळे जिल्ह्यातील ३८९३ पैकी ११४० शिक्षकांच्या जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १२० प्राथमिक शाळा शिक्षकाविना असणार आहेत. असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी येथे केले.  तसेच याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आपण भेट घेणार आहोत. त्याचप्रमाणे जिल्ह्यात बेरोजगार असलेल्या डी.एड.,  उमेदवारांना शिक्षण स्वयंसेवक या पदावर घेऊन त्यांना जिल्हा परिषदेतून मानधन द्यावे अशी मागणी करण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

कणकवली येथील शासकीय विश्रामगृहावर शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते,सतीश सावंत, अतुल रावराणे ,  युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले,सचिन सावंत ,राजू राठोड,विलास गुडेकर ,बंडू ठाकूर, सिद्धेश राणे आदी उपस्थित होते.राऊत म्हणाले, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि खासगी शाळा येत्या १५ जूनला सुरू होत आहेत. मात्र, जिल्ह्यातील  पालकांमध्ये शिक्षणाबाबतची गंभीर चिंता निर्माण झाली आहे. कारण राज्य सरकारचे शिक्षक बदलीचे  आडमुठे धोरण त्याला कारणीभूत ठरले आहे. न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून कोकणवर सूड उगविण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती आहे.जिल्ह्यामध्ये जे शिक्षक होते ते आता स्वतःच्या जिल्ह्यामध्ये गेले आहेत. जिल्हा बदली बरोबरच काही शिक्षक सेवानिवृत्त झाले. यामुळे जिल्हा परिषदेच्या शेकडो जागा शिक्षकाविना राहणार आहेत. कोणत्याही प्रकारची शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे शाळांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. येत्या ३०जूनला १३ शिक्षकही सेवानिवृत्त होत असल्याने साधारण ११४० जागा रिक्त होतील.राज्याचे शिक्षणमंत्री असलेल्या या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचे हे कटकारस्थान रचले गेले आहे. यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळा आपला डाव साधणार आहेत .

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत Deepak Kesarkarदीपक केसरकर Schoolशाळा