शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कडक नियमांमुळे वाहन अपघातांचे प्रमाण होणार कमी

By admin | Updated: January 1, 2015 00:17 IST

गेल्या पाच वर्षांत मुंबई - गोवा महामार्गासह अन्य राज्य मार्ग व अंतर्गत ग्रामीण मार्गावरही मोठ्या प्रमाणात अपघात

रत्नागिरी : वाहतूक नियमांचा भंग करणे वाहनचालकांच्या आता चांगलेच अंगाशी येणार आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात वाहन चालवताना जे चालक अपघाती मृत्यूस कारण ठरले आहेत, त्यांचे वाहन परवाने रद्द करण्यात यावेत, असा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविला जाणार आहे. त्यामुळे वाहन अपघातांची संख्या कमी होणे शक्य आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. गेल्या पाच वर्षांच्या काळात मुंबई - गोवा महामार्गासह अन्य राज्य मार्ग व अंतर्गत ग्रामीण मार्गावरही मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. यात वाहने बेदरकारपणे चालविणे, मद्य प्राशन करून वाहने चालविणे तसेच अन्य वाहतूक नियम पायदळी तुडवून वाहने हाकणे, यामुळे घडलेल्या अपघातात शेकडो लोकांचा बळी गेला आहे. या अपघातांचा आढावा घेतल्यानंतर त्याची गंभीर दखल जिल्हा पोलिसांनी घेतली आहे. या संपूर्ण अपघातांच्या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर वाहतूक नियमांचे सातत्याने उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुळावरच घाव घातल्याशिवाय समस्येची उकल होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षांत ज्यांच्या बेपर्वाईमुळे महामार्ग, राज्यमार्गावर अपघात झाले व त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, अशा प्रकरणांची वर्गवारी पोलिसांकडून केली जात आहे. त्यात दोषी असलेल्या वाहनचालकांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. तसा प्रस्ताव तातडीने उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे जिल्हा पोलिसांकडून पाठवला जाणार आहे. सन २०१३मध्ये झालेल्या ५८३ रस्ते अपघातात १५३ जणांचा बळी गेला. २०१४ या वर्षात जिल्ह्यात नोव्हेंबरअखेर झालेल्या ७७५ रस्ते अपघातात एकूण १५२ लोकांना प्राण गमवावे लागले. गेल्या पाच वर्षांचा रस्ते अपघातांचा आलेख लक्षात घेता त्यात सातत्याने वाढ होत असून, ही बाब अत्यंत गंभीर आहे. मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण येत्या दोन वर्षाच्या काळात होणार आहे. (प्रतिनिधी)सध्यस्थितीत वाढलेले अपघात रोखणे अत्यंत आवश्यक बनले आहे. त्यासाठीच जिल्हा पोलिसांनी आता गंभीरपणे पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याबाबत लवकरच कठोर उपाययोजना अमलात येणार आहे.- डॉ. संजय शिंदे, पोलीस अधीक्षक वाहतूक कोंडी रोखणारमहामार्गावरील वाहतूक कोंडीचे प्रकार कमी करण्यासाठी खेड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी व राजापूर या शहरांचा मास्टर प्लॅन बनविला जाणार आहे. त्यामुळे या शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येची उकल करणे शक्य होणार आहे. शहरात रस्त्यांची रूंदी कमी असून, वाहनांची संख्या वाढली आहे. वाहनांच्या तुलनेत रस्ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे आवश्यक उपाययोजना केली जाणार आहे.