शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतीस अडचणी, कुडाळ तालुक्यातील शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 11:42 IST

कुडाळ तालुक्यातील कडावल परिसरातील उन्हाळी शेती बहरात आली आहे. मात्र ग्रामीण भागात अनेकदा होणाऱ्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतीला पाणीपुरवठा करण्यात अडथळा येत असून त्यामुळे येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देअनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतीस पाणीपुरवठ्यास अडचणी कुडाळ तालुक्यातील शेतकरी त्रस्त : कडावल पंचक्रोशीतील समस्या

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील कडावल परिसरातील उन्हाळी शेती बहरात आली आहे. मात्र ग्रामीण भागात अनेकदा होणाऱ्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतीला पाणीपुरवठा करण्यात अडथळा येत असून त्यामुळे येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत.परिसरातील शेतकरी प्रतिवर्षी विविध प्रकारची उन्हाळी पिके घेतात. विशेषत: भुईमूग, नाचणी, चवळी, कुळीथ, मका तसेच भाजीपाल्याची इतर पिके घेण्याकडे येथील शेतकऱ्यांचा कल आहे. खरीप भात कापणीची कामगत पूर्ण झाल्यानंतर यंदाही येथील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिके घेतली आहेत.पूर्वी विहिरींवर लाट घालून शेतकरी उन्हाळी शेतीला पाणी पुरवठा करत असत. कालांतराने बहुतांश शेतकऱ्यांनी विहिरींवर विद्युत पंप बसवून सिंचनास सुरवात केली. विहिरींवरील लाट आता इतिहासजमा झाली आहे. विद्युत पंपामुळे शेतीला पाणीपुरवठा जलद होऊ लागला. लाट काढण्यासाठी लागणारे शेतकऱ्यांचे श्रमही वाचले. मात्र अनियमित वीज पुरवठ्यामुळे विद्युत पंपधारक शेतकरी यंदा मात्र अडचणीत सापडले आहेत.बहुतांश विद्युत पंपाना तीन फेज पॉवर लागते . तीनपैकी एक विद्युतलाईन बंद असली तर पंप सुरू होत नाही. मात्र अनेकदा तीन पैकी एक किंवा दोन विद्युत लाईन बंद असतात. काही वेळा तर संपूर्ण वीज पुरवठाच बंद असतो. त्यामुळे विद्युत पंपही बंद ठेवावे लागत आहेत. सध्या उन्हाळी पिके ऐन बहरात आहेत. अशा अवस्थेतच अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्गWaterपाणीFarmerशेतकरी