वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, काळगाव-तळमावले रस्त्यावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 11:51 IST2020-01-13T11:03:27+5:302020-01-13T11:51:26+5:30
काळगाव-तळमावले रस्त्यावर पहाटेच्या सुमारास धामणी गावापासून जवळच एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने सव्वा वर्षाच्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. वनविभागाने ही माहिती मिळताच जाग्यावर धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरु केली होती. सकाळपासून मृत बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, काळगाव-तळमावले रस्त्यावर धडक
सणबूर : काळगाव-तळमावले रस्त्यावर पहाटेच्या सुमारास धामणी गावापासून जवळच एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने सव्वा वर्षाच्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. वनविभागाने ही माहिती मिळताच जाग्यावर धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरु केली होती. सकाळपासून मृत बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती.
धामणी-काळगाव परिसरात बिबट्या दिसल्याची लोकांच्यात चर्चा होती, आजच्या या घटनेने सर्वांना याची खात्री झाली आहे. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धामणी गावापासून काही अंतरावर भावके वस्तीच्या पुढे हा बिबट्या ओढ्याकडील पाणवठ्याकडुन डोंगराच्या दिशेला निघाला होता.
यावेळी काळगाव कडून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात सव्वा वर्षाचा बछड्या जागीच ठार झाला. यावेळी त्याच्याबरोबर त्याची आई किंवा वडील असावेत असा अंदाज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
घटनास्थळी वनक्षेत्रपाल काळे, कर्मचारी अमृत पन्हाळे उपस्थित होते. घटनास्थळी याचा पंचनामा सुरू होता. काळे यांनी यावेळी सांगितले की या मृत बछड्यास आम्ही शवविच्छेदनासाठी नेत असून यानंतर इन कॅमेरा त्याचे दहन केले जाणार आहे. अज्ञातविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे