शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारी नौका नाट्यमयरित्या बेपत्ता, अपहरण झाल्याचा मालकांना संशय; पोलिस तपास सुरू

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 30, 2022 13:34 IST

तळाशील समुद्रात मासेमारी करत असताना अचानक 'अलसभा'ची सिग्नल यंत्रणा बंद होऊन ती गायब झाल्याच्या तक्रारीनुसार आचरा पोलीस ठाण्यात मासेमारी नौका व खलाशी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

आचरा (जि. सिंधुदुर्ग) - आचरा येथील मत्स्य उद्योजक मुजफ्फर उर्फ चावल बशीर मुजावर यांची 'अलसभा' (आयएनडी एमएच ०४ एमएम २९२१) ही मासेमारी नौका खलाशांसह अरबी समुद्रातून नाट्यमयरित्या बेपत्ता झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. तळाशील समुद्रात मासेमारी करत असताना अचानक 'अलसभा'ची सिग्नल यंत्रणा बंद होऊन ती गायब झाल्याच्या तक्रारीनुसार आचरा पोलीस ठाण्यात मासेमारी नौका व खलाशी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, नौका मालक मुजावर यांना त्यांच्या खलाशाच्या मोबाईलवरून 'व्हॉट्सअप' कॉलद्वारे हिंदी भाषिक अज्ञात व्यक्तीने संपर्क साधत १० लाखाची मागणी करत आपण कोस्ट गार्ड विभागातून बोलत असल्याची बतावणी केली. ज्याअर्थी नौका सोडविण्यासाठी पैशाची मागणी होत आहे, त्याअर्थी नौकेसह पाच खलाशांचे अपहरण केले असल्याचा दाट संशय आहे, असा अंदाज मुजावर यांनी व्यक्त करत आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांची भेट घेतली.

नौका मालक मुजावर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार नौका बेपत्ता असल्याची नोंद घेण्यात आली आहे. याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलीस, सागरी पोलीस तसेच कोस्ट गार्ड विभागाकडून तपास सुरू आहे. खलाशांकडे असलेल्या मोबाईलद्वारे लोकेशन तपासले जात आहे. आवश्यकता वाटल्यास हेलिकॉप्टरच्या साहाय्याने तपास होईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

सिग्नल दर्शवणारे दिवे झाले बंदआचरा बंदरातून रविवारी दुपारी तळाशील ते देवबागच्या दिशेने अरबी समुद्रामध्ये हुक फिशिंगसाठी 'अलसभा' ही नौका गेली होती. या नौकेवर तांडेल करीअप्पा मर्नल, पपन्ना गोशी (दोन्ही रा. कोपाळ, कर्नाटक), तर कर्फुला मिन्झ, प्रमोद किसान, राजेश मिन्झ (तिघेही रा. उडीसा) हे पाच जण होते. रविवारी मध्यरात्री तळाशील ते देवबाग समुद्रात ही नौका मासेमारी करताना मुजावर यांच्या दुसऱ्या नौकेतील खलाशांना दिसून आली होती. मात्र त्यानंतर त्या नौकेवरील सिग्नल दर्शवणारे दिवे बंद झाले आणि नौका गायब झाली.

टॅग्स :fishermanमच्छीमारPoliceपोलिस