शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

हॅकर्सच्या हल्ल्याने तळकोकण हादरले, बँकींग क्षेत्रात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 17:19 IST

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हॅकर्सनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केलेले ३० लाख रुपये वाचविण्यात या बँकेला यश मिळाले आहे.

ठळक मुद्देहॅकर्सच्या हल्ल्याने तळकोकण हादरले, बँकींग क्षेत्रात खळबळ जिल्हा बँकेच्या ३0 लाख रुपयांवर मारला होता डल्ला

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हॅकर्सनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केलेले ३० लाख रुपये वाचविण्यात या बँकेला यश मिळाले आहे. व्यक्तिगत खात्यावर आॅनलाईन फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, बँकांनाही या हॅकर्सनी लक्ष्य केल्याने बँकींग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चालू खाते आयडीबीआय बँक शाखा पणजी-गोवा येथे आहे. या खात्यामधून जिल्हा बँक आपल्या ग्राहकांना फंड वर्ग करीत असते.

असे फंड वर्ग करीत असताना जिल्हा बँकेच्या अधिकृत मेलवरून आयडीबीआय बँकेत सूचना दिल्या जातात. या सूचना प्राप्त झाल्यावर सूचनापत्रातील तपशिलाप्रमाणे आयडीबीआय बँक फंड वर्ग करण्याची कार्यवाही करीत असते.अलीकडेच जिल्हा बँकेने आयडीबीआय या बँकेत आपल्या मेलद्वारे फंड वर्ग करण्याबाबत कोणतीही सूचना दिलेली नसतानाही या बँकेने दिल्ली येथील यस बँकेच्या शाखेला त्या शाखेतील एका ग्राहकाच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे ३० लाख रुपये रक्कम वर्ग केल्याचे जिल्हा बँकेच्या अकाऊंट विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

या अधिकाऱ्यांनी ही बाब तत्काळ आयडीबीआय बँकेच्या निदर्शनास आणली. जिल्हा बँकेच्या अकाऊंट व संगणक विभागाने सतर्कता दाखवून केलेल्या कार्यवाहीमुळे आरटीजीएस असूनही ही ३० लाख रुपये एवढी रक्कम यस बँकेच्या पातळीवर राखून ठेवण्यात बँकेला यश मिळाले आहे.

याबाबतची सविस्तर माहिती घेता जिल्हा बँकेचे ई-मेल खाते हॅक करून व बनावट ई-मेलद्वारे आयडीबीआय बँकेची दिशाभूल करून जिल्हा बँकेस फसविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

याबाबतची रितसर तक्रार जिल्हा बँकेच्यावतीने सायबर सेल पोलीस दलाकडे तसेच सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.संगणक विभागाची सतर्कताग्राहकांना फसवून त्यांच्याकडून त्यांचे एटीएम नंबर तसेच खाते नंबर घेऊन त्यांच्या खात्यातील पैसे काढून फसविण्याचे प्रकार नित्य कानावर येत असतात. मात्र, हॅकर्सद्वारे प्रत्यक्ष बँकेलाच फसविण्याचा प्रकार समोर आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पणजी-गोवा येथील आयडीबीआय बँकेच्या खात्यावरून ३0 लाख रुपये एवढी रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न हॅकर्सद्वारे झाला होता. मात्र, जिल्हा बँकेच्या अकाऊंट व संगणक विभागाने सतर्कता दाखविल्याने या बँकेची तब्बल तीस लाख रुपयांची होणारी फसगत थांबविता आली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाsindhudurgसिंधुदुर्गBanking Sectorबँकिंग क्षेत्र