आॅनलाईन फसवणूक : परदेशी बँकेतील रक्कम मिळविण्यात सायबर क्राईमला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 03:28 AM2018-06-13T03:28:04+5:302018-06-13T03:28:04+5:30

हिंजवडी येथील नामांकित कंपनीची ई-मेल आयडीच्या माध्यमातून मॅन इन मिडल अ‍ॅटॅक (हॅकिंग) या सायबर गुन्हे प्रकारामुळे २ कोटी ९० लाख रुपयांच्या फसवणुकीतील सर्वच्या सर्व रक्कम चीनमधील बँकेतून परत मिळविण्यात पुणे सायबर गुन्हे शाखेला यश आले आहे़

Online fraud: Cyber ​​crime Branch success in getting foreign bank money | आॅनलाईन फसवणूक : परदेशी बँकेतील रक्कम मिळविण्यात सायबर क्राईमला यश

आॅनलाईन फसवणूक : परदेशी बँकेतील रक्कम मिळविण्यात सायबर क्राईमला यश

Next

पुणे - हिंजवडी येथील नामांकित कंपनीची ई-मेल आयडीच्या माध्यमातून मॅन इन मिडल अ‍ॅटॅक (हॅकिंग) या सायबर गुन्हे प्रकारामुळे २ कोटी ९० लाख रुपयांच्या फसवणुकीतील सर्वच्या सर्व रक्कम चीनमधील बँकेतून परत मिळविण्यात पुणे सायबर गुन्हे शाखेला यश आले आहे़ सायबर क्राईमकडे या आर्थिक फसवणुकीची तक्रार आल्यानंतर पुढच्या काही मिनिटांत कारवाईला सुरुवात झाल्याने ही सर्व रक्कम परत मिळविणे शक्य झाले आहे़
याबाबतची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली़ हिंजवडी येथील नामांकित कंपनी जगातील सर्व ठिकाणी दोन व चार चाकी अशा सर्व वाहनांचे हेड लाईट बनविण्याचे काम करते़ त्यासाठी लागणारा कच्चा माल ते इतर देशांतील सप्लायरकडून मागवितात़ कंपनीने २७ एप्रिल २०१८ रोजी मशीन खरेदीसाठी चीन देशातील मशिनरी बनविणाऱ्या कंपनीला ई-मेल आयडीद्वारे आॅर्डर पाठविली होती़ त्यानुसार अ‍ॅडव्हान्स रक्कम आधी देण्याचे ठरले व उर्वरित रक्कम मशीन मिळाल्यानंतर देण्याचे ठरले होते़ तथापि, कोणीतरी अज्ञाताने चीनमधील कंपनीच्या ई-मेल आयडीसारखा दिसणारा बनावट ई-मेल आयडी तयार करून कंपनीशी बनावट ई-मेलद्वारे संपर्क साधला व पर्चेस इनव्हॉईसवरील बँक खात्यात बदल झाल्याचे सांगून खरेदीची अ‍ॅडव्हान्स रक्कम चीनमधील अन्य बँक खात्यावर भरणा करायच्या सूचना दिल्या़ कंपनीने बँक खात्याच्या बदलाबाबत कोणतीही खात्री न करता ही रक्कम स्विफ्ट ट्रान्सफर केली़ कंपनीने पाठविलेल्या पैशाची खातरजमा करण्यासाठी कंपनीने चीनमधील कंपनीला ई-मेल केला असता त्यांनी बँक खात्यात रक्कम जमा झाली नसल्याचे सांगितले़ यावरून कंपनीची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने सायबर क्राईम सेलकडे तक्रार नोंदविली़
ही तक्रार प्राप्त होताच सायबर क्राईमने तातडीने चीनमधील बँकेला त्याची माहिती कळविली़ त्यासाठी चीनमध्ये असलेल्या भारतीय मित्रांची मदत घेण्यात आली़ कंपनीकडून बँक डिटेल्स घेऊन चीनमधील बनावट ई-मेलधारकाच्या बँक खात्याची माहिती मिळविण्यात आली़ चीनमधील स्थानिक पोलिसांशी सायबर क्राईम सेलने संपर्क साधला व त्यांच्या सहकार्याने बँकेशी पत्रव्यवहार करून फसवणूक झालेली रक्कम मूळ खात्यात तत्काळ परत मिळविण्यात सायबर क्राईमला यश आले आहे़ ही कामगिरी पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम सेलचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, मनीषा झेंडे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन गवते, शितल वानखेडे यांनी केली.

काय आहे मॅन इन मिडल अ‍ॅटॅक?
या सायबर गुन्हेगारी प्रकारामध्ये दोन वेगवेगळ्या देशांतील कंपन्यांमधील खरेदी-विक्री, आयात-निर्यात व्यवहारांबाबतचे ई-मेल संभाषण हॅक केले जाते व रक्कम देणाºया कंपनीला बनावट ई-मेल आयडी पाठवून जणू मूळ कंपनीशीच ई-मेल संभाषण करीत आहे, असे भासविले जाते़ त्यामुळे खरेदीदार कंपनी बँक खात्यात रक्कम ट्रान्सफर करण्यापूर्वी कोणतीही खात्री न करता पैसे ट्रान्सफर करते़यानंतर फसवणूक झालेली रक्कम गुन्हेगार तत्काळ काढून घेतो. त्यामुळे ती परत मिळविणे अशक्य होते़

काय काळजी घ्यावी ?

अशा प्रकारची आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांनी त्यांच्याकडील संगणक यंत्रणा, ई-मेल सुविधा सुरक्षेबाबत काळजी घ्यावी़
आंतरराष्ट्रीय व्यवहार अगर आयात-निर्यात करताना परदेशी कंपनीबाबत खात्री करुन अथवा प्रत्यक्षात भेट देऊनच व्यवहार करावेत़
परदेशी कंपनीच्या ई-मेल आयडीबाबत खात्री करावी व त्यादृष्टीने ई-मेल फिल्टरिंग सुविधा वापरावी़ शक्यतो फायरवॉल सॉफ्टवेअरचा वापर करावा़
फ्री ई-मेल सर्व्हिसचा वापर शक्यतो करू नये़ ई-मेल सर्व्हिस देणाºया वेबसर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडून संगणक यंत्रणेचे सिक्युरिटी आॅडिट करून घ्यावे़
ई-मेलची हाताळणी शक्यतो एकाच व्यक्तीकडून केली जावी़ आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी परदेशातील कंपनीकडून फोनद्वारे अगर अन्य प्रकारे खात्री करून द्यावी व मगच व्यवहार करावेत़
कंपनीचा ई-मेल आयडी, इंटरनेट कनेक्शन अन्य कोणी हाताळत नाही, याची वेळोवेळी खात्री करावी व वेळोवेळी पासवर्ड बदलावेत़
इंटरनेट सिक्युरिटी पुरविणाºया अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरचा वापर करावा़
अशा प्रकारची फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर क्राईम सेलशी ू१्रेीू८ुी१.स्र४ल्ली@ल्ल्रू.्रल्ल वर संपर्क साधावा़

Web Title: Online fraud: Cyber ​​crime Branch success in getting foreign bank money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.