शहरं
Join us  
Trending Stories
1
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
2
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
5
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
6
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
7
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
8
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
9
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
10
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
11
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
12
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
13
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
14
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
15
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
16
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
17
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
18
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
19
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्ग : सुरेश दळवींचे राष्ट्रवादीत ‘कमबॅक’

By admin | Updated: September 25, 2014 00:20 IST

केसरकरांना धक्का : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी

दोडामार्ग : राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आमदार दीपक केसरकर यांच्यासमवेत शिवबंधन बांधलेले दोडामार्ग तालुक्यातील नेते सुरेश दळवी आज, बुधवारी स्वगृही परतले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी सावंतवाडी मतदारसंघाची उमेदवारीही दळवींना जाहीर करण्यात आली. त्यामुळे विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुकीत दळवी विरुद्ध केसरकर अशी लढत होणार असून, दळवींचा पक्षप्रवेश म्हणजे केसरकरांना मोठा धक्का असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. महाराष्ट्रात सेना-भाजप महायुती आणि काँग्रे्रस-राष्ट्रवादी आघाडीची खलबते सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात थेट दीपक केसरकरांचे खंदे समर्थक सुरेश दळवी यांनाच विधानसभेच्या उमेदवारीची आॅफर देऊन सिंधुदुर्गच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. मतदारसंघातील केसरकरांचे वाढते प्राबल्य लक्षात घेता ते थोपविण्यासाठी राष्ट्रवादीने थेट दळवींना फोडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या. त्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना अखेर यश आले. दोडामार्ग तालुक्यासह सावंतवाडी व वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यांत सुरेश दळवींचा चांगला जनसंपर्क असल्याने मराठा उमेदवार देऊन केसरकरांना शह देण्याची व्यूहरचना राष्ट्रवादीने आखली आहे. त्यादृष्टीने आज सावंतवाडी विधानसभेची उमेदवारी दळवींना जाहीर करण्यात आली. मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, प्रसाद रेगे, पुष्पसेन सावंत, बाळा भिसे, प्रफुल्ल सुद्रिक, आदी उपस्थित होते. दोडामार्गला प्रथमच संधीसुरेश दळवी यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने केसरकरांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्याचबरोबर दोडामार्ग तालुक्याला नेतृत्व करण्याचीही प्रथमच संधी मिळाली आहे. आजपर्यंत दोडामार्ग तालुक्यातील एकालाही उमेदवारी मिळाली नव्हती. मात्र, दळवींच्या रूपाने तालुक्याला प्रथमच ही संधी प्राप्त झाल्याने होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)