शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कुणकेश्वर यात्रा नियोजन बैठकीचा सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 18:49 IST

कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व प्रशासन यंत्रणेने समन्वय साधून, एकोप्याने काम करून यात्रा सुरळीत पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कुणकेश्वर येथील यात्रा नियोजन बैठकीत दिल्या.

ठळक मुद्देकुणकेश्वर यात्रेपूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत : उदय चौधरी एकोप्याने काम करून यात्रा सुरळीत पार पाडा

कुणकेश्वर : देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व प्रशासन यंत्रणेने समन्वय साधून, एकोप्याने काम करून यात्रा सुरळीत पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कुणकेश्वर येथील यात्रा नियोजन बैठकीत दिल्या.कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा १३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत होत असून यात्रेच्या नियोजनबाबत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली कुणकेश्वर मंदीर येथे बैठक पार पडली. या बैठकीला पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, प्रांताधिकारी नीता सावंत, सभापती जयश्री आडिवरेकर, नायब तहसीलदार प्रिया परब, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष पुंडलिक नाणेरकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी, कुणकेश्वर उपसरपंच रामानंद वाळके आदी उपस्थित होते.यावर्षी यात्रेचा कालावधी तीन दिवसांचा असून यात्रा चांगल्या पध्दतीने पार पाडावी यासाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून यात्रेपूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिल्या.

कुणकेश्वर मंदिराकडे तारामुंबरी-मिठमुंबरी पुलामार्गे येणाऱ्या रस्त्याचा सुरूचे बन याठिकाणी असलेल्या कच्च्या रस्त्याच्या भागावर मातीचा भराव टाकून सुस्थितीत करावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला दिल्या.अंतर्गत रस्ते चिंचोळे, अरूंद आहेत. त्यामुळे यात्रेमध्ये रस्ता दुतर्फा थाटण्यात येणारी दुकाने रस्त्याच्या साईडपट्टीपासून मागे घेण्याबाबत नियोजन करावे अशी सूचना पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांनी केली. या कालावधीत टॉयलेटस, चेजींगरूमची व्यवस्था करावी, फोनचे कॉल ड्रॉप होता नये, रेंज सुरळीत असावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.एसटी प्रशासनामार्फत जिल्ह्यातून १०० गाड्यांचा ताफा यात्रेसाठी ठेवण्यात येणार असून या गाड्या कुणकेश्वर देवगड, कणकवली, मालवण, विजयदुर्ग व जिल्ह्यातील अन्य भागातून येणाऱ्या यात्रेकरूंसाठी सोडण्यात येणार आहेत अशी माहिती विभागीय नियंत्रकांनी दिली.ग्रामपंचायतीमार्फत बायोकंटेनर टॉयलेट समुद्र्किनारी ठेवण्यात आले असून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे नियोजनही ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले आहे अशी माहिती ग्रामसेवक पांडुरंग शेटगे यांनी दिली. यात्रेपूर्वी दोन दिवसांत नियोजनबध्द काम करा व यात्रा सुव्यवस्थित, चांगल्या पध्दतीने पार पाडावी असे काम करा अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके कार्यरत

  1. यात्रा कालावधीत तीन ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
  2. पार्किंग यंत्रणा व वाहतूक पोलीस यांच्यामध्ये समन्वय असावा अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्या.
  3. यात्रा कालावधीत व्यापारी वर्गासाठी आवश्यक असणाऱ्या परवान्यांची एक प्रत स्वत:कडे ठेवावी.
  4. किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग युनिट ठेवण्यात येणार आहेत
  5. परवाना नसणाऱ्या व्यापारी, व्यवसायिकांवर कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट सूचना
  6. कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्युत पोल उभारणार
  7. राज्य उत्पादन शुल्क विभागाची तीन पथके यात्रा कालावधीत कार्यरत राहणार आहेत

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtempleमंदिर