सावंतवाडीत गुरूसेवा सन्मान पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 12:04 PM2021-03-09T12:04:24+5:302021-03-09T12:06:01+5:30

Deepak Kesarkar Sindudurgnews- सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आदर्श शिक्षक निर्माण झाल्याने जिल्ह्याला एक वेगळी ओळख आहे. ही आदर्श शिक्षकांची भूमी आहे. त्यामुळेच येथे शिक्षणाचे कार्य पवित्र असून त्याला कधीही शिक्षकीपेशा म्हणता येणार नाही, असे गौरवोद्गार माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी काढले. ​​​​​​​

Distribution of Guruseva Sanman Award at Sawantwadi | सावंतवाडीत गुरूसेवा सन्मान पुरस्कार वितरण

सावंतवाडीत गुरूसेवा सन्मान पुरस्कार वितरण

Next
ठळक मुद्देसावंतवाडीत गुरूसेवा सन्मान पुरस्कार वितरण सिंधुदुर्ग आदर्श शिक्षकांची भूमी : दीपक केसरकर

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आदर्श शिक्षक निर्माण झाल्याने जिल्ह्याला एक वेगळी ओळख आहे. ही आदर्श शिक्षकांची भूमी आहे. त्यामुळेच येथे शिक्षणाचे कार्य पवित्र असून त्याला कधीही शिक्षकीपेशा म्हणता येणार नाही, असे गौरवोद्गार माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी काढले.

दीपक केसरकर मित्रमंडळ यांच्यावतीने गेली ८ वर्षे दिले जाणारा गुरुसेवा सन्मान पुरस्कार वितरण सोहळा रविवारी येथील श्रीधर कार्यालयाच्या सभागृहामध्ये पार पडला, त्यावेळी केसरकर बोलत होते.यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, विकास सावंत, व्हिक्टर डॉन्टस, अशोक दळवी आदी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच शिक्षणाच्या बाबतीत पुढे राहिला आहे. येथील शिक्षकांचे कार्य शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही मूल्यवान असे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही संपलेला नाही. अशात शाळा-महाविद्यालयेही सुरू झाली आहेत. त्यामुळे शिक्षकांनी शैक्षणिक कार्याबरोबरच विद्यार्थ्यांची काळजीही तितकीच घेणे आवश्यक आहे.

आज शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक म्हणून मोठे झालेले व शिक्षकांची काळजी घेणारे म्हणून उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांचे नाव अग्रक्रमाने येता येईल. सतीश सावंत म्हणाले, जी मुले जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात तीच मुले स्पर्धा परीक्षांमध्ये टिकतात. त्यामुळे आज ज्याप्रमाणे या मंडळाकडून शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसाच गौरव जे शिक्षक आपल्या मुलांना मोठ्या शाळेत न शिकवता जिल्हा परिषदेसारख्या शाळेत शिक्षण देत आहेत, अशा शिक्षकांचाही गौरव करण्यात यावा. यावेळी जिल्ह्यातील २५ शिक्षकांना हे पुरस्कार दिले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना प्रमाणपत्र व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

जिल्ह्यातील शिक्षकांना पुरस्कार प्रदान

या पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये सीमा पंडित, मनीषा खरात, कावेरी गावडे, दत्तकुमार फोंडेकर, रामा गावडे, अर्चना सावंत, नितीन सावंत, शंकर वाघमोडे, दादा डोंबरे, सुधीर गावडे, प्रफुल्लता धुरी, उदय गवस, श्रद्धा चोडणकर, प्रदीप शिंदे, लक्ष्मण परब, विश्वनाथ राऊळ, गुरुनाथ ताम्हणकर आदी जिल्ह्यातील शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले.

Web Title: Distribution of Guruseva Sanman Award at Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.