शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 11:00 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरुन राणे बंधूंमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे.

Nitesh Rane vs Nilesh Rane: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुतींच्या नेत्यांमध्ये सध्या फूट पडल्याचं दिसत आहे. सत्ताधारी पक्षांचे नेतेच आक्रमक भूमिका घेत एकमेकांवर हल्ला करत आहेत. अशातच माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणेंचे दोन्ही पुत्र आमने-सामने आले आहेत. भाजप नेते आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार निलेश राणे यांच्यात पु्न्हा वादाची ठिणगी पडली आहे. यापूर्वी निलेश राणे यांनी नितेश राणेंना जपून बोलण्याच सल्ला दिला होता. त्यानंतर आता नितेश राणे यांनी

स्थानिक पातळीवरील राजकारणावरुन सोशल मीडियावर राणे बंधूंमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच राणे बंधूंमध्ये राजकारणातील बाप या विधानावरुन बिनसले होते. निलेश राणेंनी नितेश यांना जपून बोलण्याचा सल्ला एक्स पोस्टवरुन दिला होता. त्यानंतर त्यांनी ती पोस्ट डिलिट केली. आता पुन्हा एकदा दोघांमध्ये वादाची ठिणगी पडलीये.  नितेश राणेंनी निलेश राणे यांच्या एका व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करत मित्र पक्षाचा पदाधिकाऱ्याला धमकवणे बरोबर नसल्याचे म्हटलं. तसेच याची नोंद घ्याल अशी अपेक्षा आहे असेही नितेश राणे म्हणाले.

नितेश राणे काय म्हणाले?

"आदरणीय निलेशजी, आपणच काही दिवसाअगोदर महायुतीबद्दल बोलला होता. आता असे आपल्याच मित्र पक्षाचा पदाधिकाऱ्याला धमकवणे बरोबर नाही. शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत. आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो," असं नितेश राणे म्हणाले. यासोबत नितेश राणेंनी एका व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट निलेश राणेंना टॅग करत पोस्ट केला आहे. त्यामुळे आता दोन्ही भावांमध्ये वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नितेशने जपून बोलावे असा सल्ला निलेश राणे यांनी दिला होता. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. त्यानंतर निलेश राणेंनी हा सल्ला दिला होता. निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. वडिल नारायण राणे हे भाजपचे खासदार, नितेश भाजपेच मंत्री तर निलेश हे शिवसेनेचे आमदार आहेत. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Nilesh Raneनिलेश राणे sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाNarayan Raneनारायण राणे