Details of ED's crime concealed, Kesarkar accuses Rajan of oil | ईडीच्या गुन्ह्याचा तपशील लपविला, केसरकर यांचा राजन तेलींवर आरोप
पाल येथील शिवसेना मेळाव्यात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नितीन शिरोडकर, सुनील मोरजकर आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देईडीच्या गुन्ह्याचा तपशील लपविलादीपक केसरकर यांचा राजन तेलींवर आरोप : पाल येथे शिवसेनेचा मेळावा

वेंगुर्ला : माझ्यावर रडीचा डाव खेळल्याचे आरोप करणाऱ्या राजन तेलींनी आपल्या प्रतिज्ञापत्रात ईडीच्या गुन्ह्याचा तपशील लपविला, असा गौप्यस्फोट पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री व शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांनी पाल येथे केला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाल येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी पालकमंत्री केसरकर बोलत होते. या मेळाव्याला जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर, पंचायत समिती सभापती सुनील मोरजकर, नगरसेवक संदेश निकम, शहरप्रमुख अजित राऊळ, संजय गावडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री केसरकर म्हणाले की, आपण कोणाला त्रास दिला नाही आणि देणार नाही. परंतु आमच्या लोकांना त्रास दिला, तर कोणाला सोडणार नाही. माझ्यावर तेलींनी रडीचा डाव खेळल्याचा आरोप केला होता. परंतु त्यांनी स्वत: मात्र आपल्या प्रतिज्ञापत्रात ईडीकडून आलेल्या नोटिसीची माहिती लपविली आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अशाप्रकारे गंभीर केस असलेल्या उमेदवारांना येथून हद्दपार करा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

Web Title: Details of ED's crime concealed, Kesarkar accuses Rajan of oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.