आरोग्य उपसंचालकाना नितेश राणेंनी धरले धारेवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 01:12 PM2021-01-30T13:12:21+5:302021-01-30T13:16:15+5:30

nitesh rane sindidurg- कणकवली तालुक्यातील शिक्षक व नागरिकांचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. ते स्वँब चाचणीसाठी ओरोसला नेण्यासाठीच्या वाहनात डिझेल नसल्यामुळे दोन दिवस अहवाल आले नाहीत. शासनाकडून डिझेलसाठी व अन्य खर्चासाठी निधी मिळत नसल्याचे कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरानी सांगितले. त्यामुळे आमदार नितेश राणे संतप्त झाले. त्यांनी आरोग्य उपसंचालक बोरसे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करत या मुद्यावरून धारेवर धरले.

Deputy Director of Health Nitesh Rane caught on edge! | आरोग्य उपसंचालकाना नितेश राणेंनी धरले धारेवर !

आरोग्य उपसंचालकाना नितेश राणेंनी धरले धारेवर !

Next
ठळक मुद्देकोरोना स्वॅब टेस्टिंगला नेण्यासाठी वाहनात डिझेल नसल्याची बाब उघड ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा नितेश राणे यांचा आरोप

कणकवली : कणकवली तालुक्यातील शिक्षक व नागरिकांचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. ते स्वँब चाचणीसाठी ओरोसला नेण्यासाठीच्या वाहनात डिझेल नसल्यामुळे दोन दिवस अहवाल आले नाहीत. शासनाकडून डिझेलसाठी व अन्य खर्चासाठी निधी मिळत नसल्याचे कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरानी सांगितले. त्यामुळे आमदार नितेश राणे संतप्त झाले. त्यांनी आरोग्य उपसंचालक बोरसे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करत या मुद्यावरून धारेवर धरले.

तसेच जोपर्यंत शासनाचा निधी येत नाही तोपर्यंत माझ्या स्वतःच्या खर्चाने डिझेल व रुग्णवाहिकेची व्यवस्था करत असल्याचे आश्वासन आमदार राणे यांनी यावेळी दिले. या निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीला राज्यातील निष्क्रिय ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला आमदार नितेश राणे यांनी शनिवारी सकाळी १० . २५ वाजण्याच्या सुमारास भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेविका मेघा गांगण, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,गणेश तळगावकर, राकेश परब आदीसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी कोरोना तपासणीसाठी घेण्यात आलेले स्वॅब हे दोन दिवस कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आहेत. त्याला जबाबदार कोण ? अशी विचारणा कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. सतीश टाक यांना आमदार नितेश राणे यांनी केली.

अनेक शिक्षकांनी शाळा सुरु होत असल्यामुळे आपले स्वॅब चाचणीसाठी दिले होते.त्यांचेही अहवाल आलेले नाहीत मग शासन नेमके करते काय ? जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी २३ कोटीचा निधी कोरोनासाठी आल्याचे सांगत आतापर्यंत ९ कोटी खर्च झाला असेही सांगितले. मग हा निधी खर्च कुठे होतोय ? या सगळ्या परिस्थितीला जिल्ह्यातील पालकमंत्री , खासदार आणि प्रशासन जबाबदार आहे.

लोकांच्या जीवाशी खेळण्याचे काम जिल्ह्यातील सत्ताधारी आणि ठाकरे सरकार करत आहे. ही गंभीर बाब आहे, या विरोधात आपण निश्चितच आवाज उठवणार आहोत . कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील प्रश्‍नांसंदर्भात जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे वेळ मागून संयुक्त बैठक घेऊन त्यात हे प्रश्न मार्गी लावले जातील असेही नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.शिकलगार व डॉ. टाक यांनी विविध समस्या यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासमोर मांडल्या. काही खर्च बऱ्याच वर्षापासून शासनाकडून मिळालेले नाही. त्यामुळे रुग्ण सेवेवर परिणाम होत आहे. तसेच ३१ जानेवारीला स्वँब टेस्टिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचार्‍यांची मुदत संपत असल्याच्या बाबीकडे आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात
आले. त्याबाबत आपण प्रशासनाला कार्यवाही करायला लावतो असेही आमदार राणे यावेळी म्हणाले.

Web Title: Deputy Director of Health Nitesh Rane caught on edge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.