शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
6
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
7
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
8
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
9
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
10
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
11
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
12
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
13
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
14
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
15
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
16
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
17
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
18
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
19
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
20
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

धरणसाठ्यात घसरण, पदरी वणवण...

By admin | Updated: June 12, 2015 00:42 IST

कोरड कायम : धडाकेबाज मान्सूनची बळीराजाला प्रतीक्षा

प्रकाश वराडकर - रत्नागिरीजिल्ह्यातील रत्नागिरी पाटबंधारे विभाग (द.) अंतर्गत येणाऱ्या २४ धरणांपैकी ७ धरणेवगळता अन्य सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात मोठी घसरण झाली आहे. मान्सूनचे धडाकेबाज आगमन अद्याप झालेले नसल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी जनतेची वणवण सुरू आहे. अनेक ठिकाणी भाताची पेरणी पूर्ण झाली असून, बळीराजा आता आकाशाकडे नजर लावून आहे. रत्नागिरी पाटबंधारे विभागाअंतर्गत जिल्ह्यात खेड येथे असलेल्या नातूवाडी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. या धरणाचा प्रकल्पीय पाणीसाठा २८.०८० दशलक्ष घनमीटर असून, खेडमधील काही नळयोजना, सिंचन क्षेत्र या धरणावर अवलंबून आहे. धरणातील पाणीसाठ्यामुळे परिसरातील उद्भवात पाणी उपलब्ध होते. मात्र, धरणातील पाणीसाठाच संपुष्टात आल्याने पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. आंबतखोल, मालघर, अडरे, गुहागर, शिरवली, सोंडेघर व शेरेवाडी या सात धरणांमध्ये १ दशलक्ष घनमीटर्सपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. उर्वरित १६ पैकी केळंबा धरणातील पाणीसाठा १७ फेब्रुवारी २०१५ रोजी संपला आहे. बारेवाडी या धरणातील पाणीसाठा २६ डिसेंबर २०१४ रोजी संपला आहे. गवाणे, निवे, असुर्डे व फणसवाडी या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. रत्नागिरी एमआयडीसीकडून हरचेरी धरणातू एमआयडीसीबरोबरच परिसरातील कुवारबाव, पोमेंडी, नाचणे, मिरजोळे, शिरगाव, कर्ला या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो. या धरणातही जून महिनाअखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. धरणातील पाणी साठ्याबाबत चिंता असली तरी जून महिना पुरेल इतके असल्याचे सांगण्यात येत असल्याने किमान नागरिकांना पुढील काही दिवस पावसाची प्रतीक्षा करता येणे शक्य आहे. (प्रतिनिधी)शीळमध्ये मुबलक पाणीरत्नागिरी तालुक्यातील शीळ धरण पाटबंधारेच्या चिपळूण विभागाकडे असून, या धरणातून रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा केला जातो. धरणात अजूनही मुबलक पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले. येत्या जुलै महिन्यापर्यंत पाऊस आला नाही तरी हे पाणी पुरेल, असे सांगण्यात आले आहे. मात्र येत्या आठवड्यात पाऊस झाला तर पुढील टंचाई टळेल. ७५ टक्के पाणी संपले रत्नागिरी पाटबंधारे विभाग (दक्षिण) अंतर्गत २४ धरणांमध्ये प्रकल्पीय पाणीसाठा क्षमता ७४.८६ दशलक्ष घनमीटर आहे. ११ जून २०१५ अखेर यातील दोन धरणातील साठा संपला आहे. उर्वरित धरणांमध्ये १७.७४० दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा आहे. प्रकल्पीय साठा व सध्याचा साठा पाहता या धरणांमध्ये सध्या २५ टक्के पाणीसाठा आहे. ७५ टक्के पाणीसाठा संपुष्टात आला आहे.