शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्ले तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षकांचे धरणे आंदोलन, मागण्यांसाठी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 15:06 IST

वेंगुर्ले तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी येथील तहसीलदार कार्यालयासमोर शनिवारी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांना द्यावयाचे मागणी पत्र निवेदनाच्या स्वरुपात तहसीलदार शरद गोसावी यांच्याकडे दिले.

ठळक मुद्देकनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसाठी नवीन पेन्शन योजना कागदावरच वेंगुर्ले तहसीलदार कार्यालयासमोर मागण्यांसाठी धरणे आंदोलन

वेंगुर्ले : तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी येथील तहसीलदार कार्यालयासमोर शनिवारी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांना द्यावयाचे मागणी पत्र निवेदनाच्या स्वरुपात तहसीलदार शरद गोसावी यांच्याकडे दिले.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य महासंघ अनेक आंदोलने करीत आहे. संघटनेसमवेत झालेल्या अनेक बैठकांमध्ये मागण्या मान्य करुनही त्याचे शासनाने अध्यादेश काढले नाहीत.

गेल्या चार-पाच वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयात नियुक्त शिक्षकांना मान्यता नाही. त्यांना विनावेतन काम करावे लागते. २००५ पासून विनाअनुदान शिक्षकांना संस्था देत असलेल्या तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. १ नोव्हेंबर २००५ पासून राज्यात नवीन पेन्शन योजना लागू झाली. पण कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसाठी ही योजना कागदावरच आहे.

२४ वर्षांनंतर निवडश्रेणी सर्वांना विना अट मिळावी, पूर्वीच्या ४२ दिवसांच्या संपकालीन रजा पूर्ववत खात्यावर जमा कराव्यात, शिक्षण सेवक योजना रद्द करावी यासह अन्य मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हा संघटनेचे सचिव दिलीप शितोळे तसेच कार्यकारिणी सदस्य प्रा. जे. जी. पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते. आंदोलनस्थळी शिक्षकेतर संघटनेचे सचिव अनिल राणे यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. 

टॅग्स :Teacherशिक्षकsindhudurgसिंधुदुर्गtahasil chowkतहसील चौक