शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपाचे ट्रॅक्टर रॅलीतून कणकवलीत शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 18:24 IST

BJP Rally Kankavli sindhudurg- मोदी सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ कणकवली येथे गुरुवारी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली काढून भाजपाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ.अनिल बोंडे, माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण आदी नेते ट्रॅक्टरमध्ये बसले होते. तर आमदार नितेश राणे हे स्वतः ट्रॅक्टर चालवत असल्याने ही रॅली लक्षवेधी ठरली.

ठळक मुद्देकृषी विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपाचे ट्रॅक्टर रॅलीतून कणकवलीत शक्तिप्रदर्शनचंद्रकांत पाटील, नारायण राणे,अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थिती

कणकवली : मोदी सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ कणकवली येथे गुरुवारी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली काढून भाजपाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ.अनिल बोंडे, माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण आदी नेते ट्रॅक्टरमध्ये बसले होते. तर आमदार नितेश राणे हे स्वतः ट्रॅक्टर चालवत असल्याने ही रॅली लक्षवेधी ठरली.केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या कृषी विधेयकांच्या समर्थनासाठी भाजपाच्यावतीने कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या ट्रॅक्टर रॅलीत बैलगाड्या घेऊन काही शेतकरी सहभागी झाले होते .

ट्रॅक्टर तसेच बैलगाड्या सुशोभित करण्यात आल्या होत्या. ढोल ताशांच्या गजरात ही रॅली काढण्यात आली. तर डोक्याला भगवे फेटे बांधून कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभागही लक्षणीय होता.सकाळी ११ .३० वाजता मुडेडोंगरी मैदान येथून सुरू झालेली ट्रॅक्टर रॅली भाजपा कार्यालयाजवळील जाहीर सभेच्या ठिकाणी पोहचली. यावेळी माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश चिटणीस प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर,जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक,माजी आमदार ऍड. अजित गोगटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, संजना सावंत,दिपलक्ष्मी पडते, प्रभाकर सावंत, राजू राऊळ, राजन चिके, जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, महेश गुरव,नगराध्यक्ष समीर नलावडे, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, सावी लोके,सोनू सावंत, प्रियांका साळसकर,राजश्री धुमाळे,मेघा गागंण, सुप्रिया नलावडे,कविता राणे,प्रतिक्षा सावंत,रवींद्र शेट्ये,मनोज रावराणे,बंड्या मांजरेकर, नासिर काझी ,अण्णा कोदे , बबलू सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग