सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणमधील समस्या सोडविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 15:27 IST2017-10-28T15:23:16+5:302017-10-28T15:27:48+5:30
सिंधुदुर्गनगरी शहराच्या उभारणीस २५ वर्षे झाली. मात्र या सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रातील समस्या कायम आहेत. या समस्यांकडे शिवसेनेचे ओरोस ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य लक्ष्मीकांत परब यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचे लक्ष वेधत या समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी केली आहे.

सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणमधील समस्या सोडविण्याची मागणी
सिंधुदुर्गनगरी , दि. २८ : सिंधुदुर्गनगरी शहराच्या उभारणीस २५ वर्षे झाली. मात्र या सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रातील समस्या कायम आहेत. या समस्यांकडे शिवसेनेचे ओरोस ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य लक्ष्मीकांत परब यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचे लक्ष वेधत या समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी केली आहे.
सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण अस्तित्वात आल्यानंतर या ठिकाणी शासकीय वसाहती बांधण्यात आल्या त्यानतर खासगी वसाहती निर्माण करण्यात आल्या. या ठिकाणी गेली कित्येक वर्षे कर्मचारी राहत आहेत. परंतु या प्राधिकरण क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना ज्या सुविधा मिळायला हव्या होत्या त्या अद्याप मिळालेल्या नाहीत.
यात पिण्याच्या शुध्द पाण्याची गैरसोय, पथदीप असणे, भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, रस्त्यांची दुरावस्था, रास्त्यांवर वाढलेली झाडी, सांडपाणी आणि ड्रेनेजची दुरावस्था, प्राधिकरण क्षेत्रातील गार्डनची दुरावस्था, दरदिवशी कचरा गोळा करण्याच्या गाडीचा अभाव, वसाहती मधील साफसफाई व स्वच्छतेचा अभाव आणि मोकळ्या जागेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यानाची कमतरता आदी समस्या या प्राधिकरण क्षेत्रात आहेत.
यासमस्यांबाबत ओरोस ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य लक्ष्मीकांत परब यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचे लक्ष वेधले आहे. तसेच प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून लवकरात लवकर या समस्या मार्गी लावण्यात अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.