शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
6
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
7
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
8
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
9
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
10
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
11
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
12
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
13
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
14
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
15
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
16
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
17
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
18
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
19
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
20
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

सिंधुदुर्गात काथ्या उद्योगाची १४ युनिटे उभारणार : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 3:47 PM

वेंगुर्ले : चांदा ते बांदा योजनेअंतर्गत सिंधुदुर्गात काथ्या उद्योगाची १४ युनिटे उभारली जाणार असून, त्यातील सहा युनिटे कार्यान्वित झाली ...

ठळक मुद्देसिंधुदुर्गात काथ्या उद्योगाची १४ युनिटे उभारणार : दीपक केसरकरबचतगट, शेतकऱ्यांनी प्रस्ताव तत्काळ सादर करावेत

वेंगुर्ले : चांदा ते बांदा योजनेअंतर्गत सिंधुदुर्गात काथ्या उद्योगाची १४ युनिटे उभारली जाणार असून, त्यातील सहा युनिटे कार्यान्वित झाली आहेत. नारळापासून विविध पदार्थांच्या उत्पादनासाठी प्रक्रिया उद्योग उभारल्यास ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य निर्माण होईल. या दृष्टीने संबंधित विभागांनी बचतगट व शेतकऱ्यांना प्रशिक्षणे तसेच प्रकल्प अहवाल याबाबतचे प्रस्ताव तत्काळ सादर करावेत, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केली.वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य लघुउद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, वेंगुर्ले तहसीलदार शरद गोसावी, मुख्याधिकारी वैभव साबळे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, फळ संशोधन केंद्र्राचे बी. एन. सावंत, उद्योजक प्रशांत कामत, चांदा ते बांदाच्या प्रकल्प अधिकारी नंदिनी घाणेकर, खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. केंजले, केरळ क्वॉयर बोर्डाचे प्रा. मनोज अय्यर, एम. व्ही. अशोक, रणजित सावंत, कृषी विद्यापीठाचे विजय दळवी, अभिजीत महाजन आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले, निरापासून साखर, चॉकलेट, मध उत्पादन करण्याबाबतचे प्रशिक्षण खादी ग्रामोद्योग मंडळाने घ्यावे. जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या माणगा या बांबूच्या जातीपेक्षा उत्ती संवर्धन रोपवाटिकेद्वारे बांबूची रोपे तयार करण्याबाबत कोकण कृषी विद्यापीठाने प्रस्ताव द्यावा, आदी सूचना केल्या.जागा उपलब्धतेसाठी प्रयत्न करा!नारळाच्या सोडणापासून काथ्या, खोबऱ्यांपासून खाण्याचे पदार्थ व खोबरेल, चॉकलेट, गूळ यासारखे प्रक्रिया उद्योग उभारले जाऊ शकतात. यासाठी काथ्या प्रक्रिया उद्योगाची उर्वरित युनिटे त्वरित सुरू करणे गरजेचे असून, त्यादृष्टीने महसूल विभागाने जागा उपलब्धतेबाबत प्रयत्न करावेत, अशी सूचना यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी केली. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग