Dedication of Cardiac Ambulance, Youth Initiative | कार्डिॲक रुग्णवाहिकेचे लोकार्पण, तरुणांचा पुढाकार

मालवणातील पहिल्या कार्डिॲक रुग्णवाहिकेचे लोकार्पण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देकार्डिॲक रुग्णवाहिकेचे लोकार्पण, तरुणांचा पुढाकार कांदळगावकर यांच्या हस्ते उद्घाटन

मालवण : व्हेंटिलेटरसह अन्य अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज कार्डिॲक रुग्णवाहिकेचे लोकार्पण दसरोत्सवाच्या निमित्ताने शहरात करण्यात आले. अवधूत परुळेकर व चेतन हरमलकर या तरुणांच्या पुढाकारातून ही रुग्णवाहिका मालवणवासीयांच्या सेवेत दाखल झाली आहे.

गंभीर स्थितीतील रुग्णांना अधिक उपचारासाठी अन्य ठिकाणी नेण्यासाठी कार्डिॲक रुग्णवाहिका आवश्यक असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा दोन रुग्णवाहिका आहेत. जिल्ह्यातील ही तिसरी रुग्णवाहिका असून मालवणातील पहिलीच ह्यकार्डिॲकह्ण रुग्णवाहिका आहे.

अत्यावश्यक स्थितीत रुग्णवाहिकेत डॉक्टरही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या रुग्णवाहिकेतून मालवण शहरात मोफत सेवा दिली जाणार आहे. तर रुग्णाला मालवण शहाराबाहेर अन्य रुग्णालयात नेण्यासाठी माफक दरात सेवा उपलब्ध असेल, अशी माहिती अवधूत परुळेकर यांनी दिली.

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते फोवकांडा पिंपळ पार येथे कार्डिॲक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अवधूत परुळेकर व चेतन हरमलकर यांसह उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, पंकज सादये, महेंद्र म्हाडगुत, जॉन नऱ्होना, सुबोध गावकर, बाबा मांजरेकर व अन्य नागरिक उपस्थित होते.

 

Web Title: Dedication of Cardiac Ambulance, Youth Initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.