शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

एस टी कामगारांचा पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय, दिलीप साटम यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 20:25 IST

एस.टी. कामगारांना अपेक्षित वेतनवाढ मिळत नसल्याने शासनाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा प्रस्ताव आयोग कृती समितीने फेटाळला आहे. तसेच आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पुन्हा एकदा संप करण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबई येथे  झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती एस टी कामगार संघटनेचे सिंधुदुर्ग विभागीय सचिव दिलीप साटम यांनी दिली.

 कणकवली - एस.टी. कामगारांना अपेक्षित वेतनवाढ मिळत नसल्याने शासनाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा प्रस्ताव आयोग कृती समितीने फेटाळला आहे. तसेच आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पुन्हा एकदा संप करण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबई येथे  झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती एस टी कामगार संघटनेचे सिंधुदुर्ग विभागीय सचिव दिलीप साटम यांनी दिली.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुंबई येथे शुक्रवारी एस टी का मगारांच्या आयोग कृती समितीची बैठक झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मागील संपाच्यावेळी वेतनवाढीपोटी 1076 कोटींचा प्रशासनाने दिलेला प्रस्ताव आयोग कृती समितीने नाकारला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये गठित केलेल्या उच्च स्तरीय समितीने उच्च न्यायालयात सादर केलेल्या शिफारशीमध्ये पूर्वी प्रशासनाने देवू केलेल्या 2.57 च्या सूत्रांऐवजी 2.37 चे सूत्र दिलेले आहे. वार्षिक वेतन वाढीचा दर 3 टक्याऐवजी 2 टक्के केला आहे.

          घर भाड़े भत्यामध्ये 10 टक्क्यांऐवजी  7 टक्के, 20 टक्क्यांऐवजी 14 टक्के, 30 टक्क्या ऐवजी 21 टक्के घट केली आहे. सुधारित वेतन वाढीची अंमलबजावणी 1 एप्रिल 2016 ऐवजी 1 जानेवारी 2018 पासून 4 वर्षासाठी करणे. या प्रस्तावामुळे एस टी कामगारांना अपेक्षित वेतन वाढ मिळत नसल्याने उच्च स्तरीय समितीचा हा प्रस्ताव आयोग कृती समितीने फेटाळला असून संपासह इतर आंदोलने करण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे.               त्यानुसार 25 जानेवारी रोजी राज्यभर  डेपो किंवा युनिटच्या गेटवर उच्च स्तरीय समितीच्या अहवालाची होळी करण्यात येणार आहे. 9 फेब्रुवारी रोजी राज्यभरातील एस टी कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कुटुंबियांसह मुंबई येथे आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. तसेच त्याच दिवशी संपाची तारीख निश्चित केली जाणार आहे. असेही या पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळsindhudurgसिंधुदुर्ग