Decision to establish Sindhudurg District Horticulture Association | सिंधुदुर्ग जिल्हा बागायतदार संघ स्थापन करण्याचा निर्णय

सिंधुदुर्ग जिल्हा बागायतदार संघ स्थापन करण्याचा निर्णय

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा बागायतदार संघ स्थापन करण्याचा निर्णय काजू बी खरेदीसाठी सोसायट्यांना कॅश क्रेडीट: सतीश सावंत

सिंधुदुर्ग : शेतकऱ्यांच्या काजू बी सह फळपिकांना चांगला दर मिळवून देण्यासाठी गोवा बागायतदार सहकारी संघाच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्हा बागायतदार सहकारी संघ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर गतवर्षीप्रमाणे यावर्षीही काजू बीच्या खरेदीसाठी सोसायट्यांना जिल्हा बँक तर्फे ९ टक्के व्याज दराने कॅश क्रेडीट कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा काजू समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीला जिल्हाभरातून काजू बागायतदार शेतकरी उपस्थित होते. या बैठकीत बागायतदार शेतकऱ्यांच्या काजू बी पिकासह अन्य फळपिकांना चांगला दर मिळवून देण्यासंदर्भात चर्चा झाली. सावंत यांनी याबाबतची माहिती यावेळी समन्वय समितीचे जिल्हा समन्वयक संदीप राणे उपस्थित होते.

यावेळी सतीश सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागात काजू बी चे दर वेगवेगळे आहेत. काजू बी चा दर १०० रुपये प्रति किलो एवढा खाली घसरला आहे. त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यांच्या काजू बी ला चांगला दर मिळावा यासाठी समन्वय समितीचे प्रयत्न आहेत. आजच्या बैठकीत गोव्याला ज्याप्रमाणे गोवा बागायतदार शेतकरी सहकारी संघ कार्यरत आहे त्याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्हा बागायतदार शेतकरी संघ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी येत्या १९ एप्रिल रोजी गोवा बागायतदार शेतकरी संघाचे कामकाज पाहण्यासाठी व त्यांचा अभ्यास करण्यासाठी समन्वय समितीचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.

दोडामार्ग, बांदा या भागातील शेतकऱ्यांनी काजूबी १२५ रुपये प्रति किलो दराने विक्री करावी. त्यापेक्षा कमी दराने विकू नये. तसेच अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांनी ११५ रुपये प्रति किलो दराने काजू बी ची विक्री करावी त्यापेक्षा कमी दराने विकू नये. असे आवाहन केले. आपल्याकडील काजू बी ची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी सोसायटयाना जिल्हा बँकेतर्फे गतवर्षीपेक्षा अर्धा टक्का कमी दराने नऊ टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. त्यांनी ११५ रुपये प्रति किलो या दराने शेतकऱ्यांची काजूबी खरेदी करावी. गेल्या वर्षी हा प्रयोग यशस्वी झाला होता .

Web Title: Decision to establish Sindhudurg District Horticulture Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.