शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

फळपीक विमा संरक्षण रकमेत कपातीचा निर्णय

By admin | Updated: November 9, 2014 23:36 IST

बागायतदारांना फटका : हप्त्यात घट होण्याची शक्यता

रत्नागिरी : अवेळचा पाऊस व उच्चत्तम तापमान यामुळे आंबा आणि काजू पिकावर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेता शासनाने कृषी विभागाच्यावतीने हवामानावर आधारित पथदर्शक फळपीक विमा योजना सुरू केली. मात्र, यावर्षी विमा रकमेत २५ ते ५० टक्के कपात केल्यामुळे शेतकरीवर्गाला त्याचा फटका बसणार आहे.अवेळचा पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान या निकषावर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येते. त्यासाठी फळपीक विमा योजना सुरू केली. सुरूवातीला तापमान मोजमाप यंत्र चुकीच्या ठिकाणी बसविल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळाला नाही. गतवर्षी राबविलेल्या विमा योजनेबाबत अद्याप नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली नाही. यावर्षी विमा योजना चालू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, विमा संरक्षण यंत्रणेत २५ ते ५० टक्के कपात केल्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. आंबा, काजू, द्राक्ष, केळी, संत्री, मोसंबी, डाळिंब या पिकांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. आंबा पिकासाठी यावर्षी त्या रकमेत घट करून ७५ हजारावर आणली आहे. काजूला हेक्टरी सुधारित योजनेंतर्गत पूर्वीच्या रकमेत घट करून ती ५६ हजार २५० रूपयांवर आणली आहे. राज्यातील जळगाव, धुळे, बुलडाणा, बीड, वर्धा, नागपूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, अहमदनगर, लातूर, रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्याचा त्यात समावेश आहे. विमा कंपन्यांनी निवडक जिल्ह्यांसाठी पूर्वीीच्या विमा संरक्षित रकमेवर हरकत घेतल्याने विमा कंपनीच्या दबावापुढे झुकत कृषी विभागाने शेतकऱ्यांचा विचार न करता १६ आॅक्टोबरला विमा रकमेत २५ ते ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०११-१२ मध्ये १८६६.४७ हेक्टर बाधित क्षेत्रावरील १३६२ लाभार्थींना ३४ लाख ४१ हजार ५०० रूपये नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली. २०१२-१३ मध्ये ११२० हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १२८६ लाभार्थींना २ कोटी ३२ लाख ७९ हजार ५०० रूपये नुकसान भरपाई देण्यात आली. सुरूवातीला विम्याचा हप्ता आठ हजार होता. मात्र, गतवर्षी त्या रकमेत वाढ करून ती १२ हजार रूपये करण्यात आली होती. राज्याचे ३०००, केंद्र शासनाचे ३०००, तर शेतकऱ्यांना ६००० रूपये भरावे लागले होते. मात्र, यावर्षी विमा सरंक्षण रकमेतच कपात केल्यामुळे हप्त्यात घट होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी फळपीक विमा योजना सुरू केली आहे की, विमा कंपन्यांच्या रक्षणासाठी? दरवर्षी संबंधित निकषामध्ये बदल केला जातो. हवामनावर आधारित पथदर्शी फळपीक विमा योजना राबवताना भौगोलिक परिस्थितीचाही विचार केला जाणे गरजेचे आहे. मात्र, त्यात अपेक्षित बदल केले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेकडे पाठ फिरविलेली दिसून येते. कर्जदारांना सक्तीची असतानादेखील काही शेतकऱ्यांनी ही योजना नाकारलेली दिसून येते. - ए. एस. शितूत, रत्नागिरी.