शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

सिंधुदुर्गचा डोंगराळ’मध्ये समावेशाचा निर्णय

By admin | Updated: June 27, 2015 00:22 IST

वैभव नाईक : मालवण येथील बैठकीत माहिती

मालवण : शिक्षणाबरोबरच ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुधारणे आवश्यक आहे. शिक्षण व आरोग्य योजनेच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे. शिक्षणाचे सार्वत्रीकरण करून ते तळागाळापर्यंत पोहोचविणे आवश्यक असून, तालुक्यात विशेष आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी मंत्री मंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचा डोंगराळ प्रवर्गामध्ये समावेश करण्याबाबत निर्णय झाला असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात आरोग्य व शिक्षण तालुका सनियंत्रण सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी समिती अध्यक्ष आमदार वैभव नाईक, तहसीलदार वनिता पाटील, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सभापती सीमा परुळेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीराम शिरसाट, जिल्हा परिषदेचे सदस्य संग्राम प्रभूगावकर, समिती सदस्या भाग्यता वायंगणकर, उदय दुखंडे, आरोग्य विस्तार अधिकारी सूरज बांगर, शिक्षण विस्तार अधिकारी वसंत महाले यांच्यासह अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होते.तालुक्याच्या आरोग्यविषयक स्थितीची माहिती देताना समिती सचिव तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ म्हणाले, महाराष्ट्र राज्याचा जन्मदर १२ एवढा आहे. मात्र, मालवण तालुक्याचा जन्मदर ८.९ टक्के एवढा आहे. केरळ राज्यात देशात सर्वाधिक कमी ६ टक्के एवढा जन्मदर आहे. केरळ राज्याशी मालवणची स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कमी जन्मदर मालवण तालुक्यात आहे. अर्भक मृत्यूप्रमाण ११ टक्के आहे, तर गतवर्षी एकाही मातेचा मृत्यू झाला नाही, असे सांगितले.यावेळी आमदार नाईक म्हणाले, तालुक्यासाठी आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याला डोंगराळ भागाचा विशेष दर्जा देण्यात यावा यासाठी निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे डॉक्टरांना अधिकाधिक सुविधा पुरविता येणे शक्य होणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीबाबतही प्रस्ताव तयार करून ते आपल्याकडे पाठवून द्या तसेच तालुक्यात कुपोषण निर्मूलनासाठी १० ते १२ लाख दरवर्षी खर्च केले जातात. भविष्यात तालुक्यात एकही कुपोषित बालक राहता कामा नये असे आमदार नाईक यांनी सांगितले.गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर म्हणाले, तालुक्यातील प्रत्येक शाळांमध्ये किमान एक तरी सुस्थितीतील संगणक असावा व तो पुरविण्याचा उपक्रम पंचायत समितीने हाती घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या १३ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यात आला आहे. आरोग्यमंत्र्यांनी लक्ष द्यावेमालवण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना १० वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत. मात्र, यातील पाच पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. यामध्ये ७६ एमबीबीएस पदे मंजूर आहेत. यातील २० पदे रिक्त आहेत, तर ६ पदे भरलेली आहेत. परंतु, तेही दुसरीकडे कार्यरत आहेत, तर ८ डॉक्टर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुटीवर आहेत. जिल्ह्याला ८ तालुका वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत. मात्र, तीनच पदे कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे १०८ नंबरची रूग्णवाहिका केवळ गोवा व कोल्हापूर येथेच रूग्णांना घेऊन जाते. एखाद्या रुग्णाला मुंबईला घेऊन जायचे असेल तर ही रुग्णवाहिका पाठविली जात नाही. राज्याचे आरोग्यमंत्री या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांनी किमान विशेष पॅकेज म्हणून लक्ष द्यावे, असे आवाहन संग्राम प्रभूगावकर यांनी केले.