शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गावराई तेलीवाडी येथील घटना, विहिरीत पडून मृत्यू वृद्ध दांम्पत्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 18:20 IST

परसबागेत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत असताना कठडा नसलेल्या विहीरित पडून गावराई तेलीवाडी येथील हरिश्चंद्र नारायण मयेकर (७०) आणि वैजयंती हरिश्चंद्र मयेकर (६८) या वृद्ध दांपत्याचा मृत्यु झाला आहे. या घटनेमुळे मयेकर कुटुंबासह गावराई गावावर शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देगावराई तेलीवाडी येथील घटनाविहिरीत पडून मृत्यू वृद्ध दांम्पत्याचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : परसबागेत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत असताना कठडा नसलेल्या विहीरित पडून गावराई तेलीवाडी येथील हरिश्चंद्र नारायण मयेकर (७०) आणि वैजयंती हरिश्चंद्र मयेकर (६८) या वृद्ध दांपत्याचा मृत्यु झाला आहे. या घटनेमुळे मयेकर कुटुंबासह गावराई गावावर शोककळा पसरली आहे.याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कुडाळ तालुक्यातील गावराई तेलीवाडी येथे राहणाऱ्या मयेकर दांपत्याने आपल्या परस बागेतील पाला पाचोळा जाळण्यासाठी बुधवार ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास आग घातली होती. मात्र ही बघता बघता अन्यत्र पसरु लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी वृद्ध मयेकर दांपत्य प्रयत्न करत होते.

पेटवलेली आग विहीरीवर बसविण्यात आलेल्या पाण्याच्या पंपाकडे सरकत होती. ही आग पंपाकड़े जाऊन धोका होऊ नये यासाठी आग विझविण्यासाठी हरिश्चंद्र मयेकर व वैजयंती मयेकर विहिरीजवळ गेले होते. मात्र या घाईगडबडित तोल जावून कठडा नसलेल्या विहीरित पडून मयेकर दाम्पत्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे.परस बागेला लागलेली आग पाहता शेजारी राहणाऱ्या जगताप कुटुंबाने मयेकर यांना फोन केला होता. मात्र फोन उचलत नसल्याने त्यांनी मयेकर यांच्या घरी जावून पाहणी केली असता ते घरात दिसून आले नाहीत. आजूबाजूला पाहिले असता मयेकर दाम्पत्याचा विहीरित पडून मृत्यू झाल्याचे दिसून आले. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

याबाबतची माहिती जगताप यांनी पोलीस पाटील यांना दिली. त्यांनी लागलीच याबाबत ओरोस पोलीसांना कल्पना दिली. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद पवार, पोलीस उपनिरीक्षक रवि जाधव, पोलिस हवालदार एम. एन. पडणेकर, आर. के. राठोड, पोलीस नाईक आशिष शेलटकर यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थ शुभम राठीवडेकर यांच्या मदतीने मयेकर दाम्पत्याचे मृतदेह विहिरीबाहेर काढून घटनेचा पंचनामा केला.मृत मयेकर यांच्या डोक्याला मार लागलेला दिसून येत आहे. त्यामुळे पत्नीला वाचविण्यासाठी विहिरीमध्ये उतरत असताना हात सुटुन ते विहिरीच्या दगडाला आपटले असावेत आणि पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला असा अंदाजही पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. मयेकर यांच्या पश्चात विवाहित दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग