नारळ काढताना झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू, मालवण-गवंडीवाडा येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 03:58 PM2019-09-24T15:58:05+5:302019-09-24T16:00:48+5:30

मालवण शहरातील गवंडीवाडा येथील एका नारळाच्या झाडावरून पाय घसरून पडल्याने फ्रान्सीस उर्फ बाबूश कैतान इस्तूबूर (५९, रा. गवंडीवाडा) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. याबाबत येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

 Death of an old man falling from a tree while extracting coconut, an incident in Malvan-Gwandiwada | नारळ काढताना झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू, मालवण-गवंडीवाडा येथील घटना

नारळ काढताना झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू, मालवण-गवंडीवाडा येथील घटना

Next
ठळक मुद्दे नारळ काढताना झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू मालवण-गवंडीवाडा येथील घटना

मालवण : शहरातील गवंडीवाडा येथील एका नारळाच्या झाडावरून पाय घसरून पडल्याने फ्रान्सीस उर्फ बाबूश कैतान इस्तूबूर (५९, रा. गवंडीवाडा) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. याबाबत येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

गवंडीवाडा येथील फ्रान्सीस इस्तूबूर हे गेली अनेक वर्षे नारळ काढण्याचे काम करीत होते. सोमवारी दुपारी ते गवंडीवाडा येथील गिरप यांच्या मालकीच्या नारळाच्या झाडावर नारळ काढण्यास चढले होते. त्यावेळी अचानक पाय घसरल्याने ते खाली कोसळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मृत झाल्याचे घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष राजू वराडकर यांच्यासह अन्य नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. अधिक तपास विलास टेंबुलकर हे करीत आहेत. फ्रान्सीस यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, मुलगा असा परिवार आहे.

Web Title:  Death of an old man falling from a tree while extracting coconut, an incident in Malvan-Gwandiwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.