शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

sindhudurg: ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून रोलर ऑपरेटरचा मृत्यू? घातपाताच्या दृष्टीनेही तपास सुरू

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 8, 2023 17:47 IST

अनेक संशयास्पद बाबी समोर

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : आडाळी एमआयडीसीत निर्जनस्थळी रस्त्यावर झोपलेल्या रोलर ऑपरेटरला भरधाव ट्रॅक्टरने चाकाखाली चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. माणिक रोहिदास चव्हाण (२४ रा.आंबेतांडा ता.कन्नड जि. संभाजिनगर) असे त्याचे नाव असून ट्रॅक्टर चालक शेखर बोराडे याच्यावर दोडामार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा जरी वरकरणी अपघात वाटत असला तरी संशयास्पद अशा अनेक बाबी समोर आल्याने त्याच्या मृत्यूमागे घातपात तर नाही ना? यादृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी मृत माणिक चव्हाण हा आडाळी एमआयडीसी त रोलर ऑपरेटर म्हणून काम करायचा. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याच्याजवळ कोणतेही काम नव्हते. त्यामुळे तो नवीन कामाच्या शोधात होता. तो काल रात्रौ ८.३० वा. च्या दरम्यान एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यावर एच पॉइंटजवळ झोपला होता.त्याचदरम्यान शेखर बोराडे आपल्या ताब्यातील भरधाव ट्रॅक्टर घेऊन जात असताना त्याला झोपलेला माणिक दिसला नाही. परिणामी ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने तो चाकाखाली चिरडून मरण पावला. याबाबतची माहिती गावात समजताच गावकऱ्यांनी त्याला उपचारासाठी मोरगाव प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले. तेथून पुढे सावंतवाडी त नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश ठाकूर करीत आहेत.

अनेक संशयास्पद बाबी समोरआडाळी एमआयडीसीतील रोलर ऑपरेटर चा जरी वरकरणी अपघाती मृत्यू वाटत असला तरी ट्रॅक्टर चालकाने दिलेल्या जबानी नुसार अनेक संशयास्पद बाबीसमोर आल्या आहेत. घटनास्थळाचा भाग निर्जंन व चढणीचा होता त्यामुळे आपण वेगात होतो परिणामी झोपलेल्या माणिकचा अंदाज आपल्याला आला नाही आणि अपघात घडला असे जबाबात त्याने सांगितले. मात्र मुळात मृत माणिक निर्जनस्थळी का झोपला असेल ? आणि जर खरोखरच झोपला तर त्याला ट्रॅक्टरचा आवाज कसा काय ऐकू आला नाही ?आणि जर चढणीचा भाग होता तर ट्रॅक्टर भरधाव कसा असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जे सध्या अनुत्तरित आहेत. त्यामुळे मृत माणिकचा मृत्यू अपघाती होता की त्यामागे घातपाताचे कारण आहे यदृष्टीनेही तपास होणे गरजेचे आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस