आरोसमध्ये मृत माकड आढळले, वन, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 04:02 PM2020-02-14T16:02:11+5:302020-02-14T16:04:03+5:30

आरोस-वरचीआळी येथे सुमारे चार वर्षांचा मृत माकड आढळल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. पूर्वीच्या घटनेवेळी वनविभागास कळवूनही न आल्याने याची खबर आरोग्य विभागास देण्यात आली. मात्र, वनविभागचा कोणताही अधिकारी वा कर्मचारी न आल्याने ग्रामस्थांनीच माकडावर अंतिम संस्कार केले. ग्रामस्थांच्या आरोग्याचे सोयरसुतक नसलेल्या अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Dead monkey was found in Aaros, forest, neglect of health department | आरोसमध्ये मृत माकड आढळले, वन, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

आरोसमध्ये मृत माकड आढळले, वन, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देआरोसमध्ये मृत माकड आढळलेवन, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

सावंतवाडी : आरोस-वरचीआळी येथे सुमारे चार वर्षांचा मृत माकड आढळल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. पूर्वीच्या घटनेवेळी वनविभागास कळवूनही न आल्याने याची खबर आरोग्य विभागास देण्यात आली. मात्र, वनविभागचा कोणताही अधिकारी वा कर्मचारी न आल्याने ग्रामस्थांनीच माकडावर अंतिम संस्कार केले. ग्रामस्थांच्या आरोग्याचे सोयरसुतक नसलेल्या अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सतर्क राहण्याची आवश्यकता असतानादेखील अशा घटनांकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. आरोस-वरचीआळी येथे शेतकरी महेश आरोसकर यांच्या काजू बागेत मृत माकड दिसून आले. गावात पूर्वी तीन माकड मृत सापडले होते. त्यावेळी वारंवार वनविभागास कळवूनही दखल न घेतल्याने आजच्या घटनेची खबर त्यांनी आरोग्य विभागास दिली. परंतु निद्रावस्थेत तसेच बेजबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांनी यावेळी घटनास्थळी येणे टाळले व ग्रामस्थांनाच त्या मृत माकडाची विल्हेवाट लावण्यास सांगितले.

त्यामुळे एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट करण्यात आली असली तरी ग्रामीण भागात मात्र त्याकडे कानाडोळा केला जात असल्याचे महेश आरोसकर यांनी सांगितले. शेवटी ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी देऊ परब, गोपाळ नाईक यांनी मृत माकडाची विल्हेवाट लावली.

दरम्यान, वनविभागाशी संपर्क साधला असता मृत माकडांची विल्हेवाट लावण्याचे सर्व अधिकार ग्रामपंचायतीला दिले आहेत. तरी सुद्धा आम्ही जवळपास असल्यास घटनास्थळी जात असल्याचे आजगाव वनपाल धुरी यांनी सांगितले. तसेच आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Dead monkey was found in Aaros, forest, neglect of health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.