शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

भडगावचे दयानंद लोट भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त, २८ वर्षे बजावली देशसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 3:41 PM

भारतीय सैन्यात गेली २८ वर्षे सेवा बजावणारे भडगाव बुद्रुकचे (ता. कुडाळ) सुपुत्र सुभेदार दयानंद राजाराम लोट हे सुभेदार पदावरून सेवानिवृत्त झाले. यावेळी लष्कराचे सुभेदार मेजर नवीन नानैया यांच्या हस्ते लोट यांचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देभडगावचे दयानंद लोट भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त, २८ वर्षे बजावली देशसेवा मालवणात पूर्ण केले शिक्षण, लष्कराच्या सुभेदारांकडून सत्कार

मालवण : भारतीय सैन्यात गेली २८ वर्षे सेवा बजावणारे भडगाव बुद्रुकचे (ता. कुडाळ) सुपुत्र सुभेदार दयानंद राजाराम लोट हे सुभेदार पदावरून सेवानिवृत्त झाले. यावेळी लष्कराचे सुभेदार मेजर नवीन नानैया यांच्या हस्ते लोट यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जवान उपस्थित होते. आपल्या वडिलांप्रमाणेच देशसेवेचे व्रत हाती घेत सुभेदार बनलेल्या दयानंद लोट यांनी देशाच्या सीमेवर विविधभागात देशरक्षणाचे काम करताना उल्लेखनीय कामगिरी बजावली.कुडाळ तालुक्यातील भडगाव बुद्रुक येथे दयानंद यांचे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण मालवण येथील माजी सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहात राहून पूर्ण केले. मालवणमधील भंडारी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये आणि महाविद्यालयीन पदवी शिक्षण स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात घेतल्यानंतर दयानंद हे वडीलांप्रमाणे देशसेवेकडे वळले. त्यांची २६ जून १९९२ रोजी सैनिक म्हणून भारतीय सैन्यात भरती झाली.सैन्यात काम करताना त्यांनी जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, झारखंड, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, पुणे येथे देश रक्षणाचे काम केले. सैन्यात २८ वर्षे सेवा बजावल्यावर ते सुभेदार या पदावरून सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर दयानंद हे पुण्यात स्थायिक झाले असून आपल्या दोन मुलींच्या शिक्षणासाठी वेळ देणार आहेत. सैन्यात देशसेवेचे कर्तव्य बजावताना त्यांना नेहमीच त्यांची पत्नी रेश्मा यांची मोलाची साथ लाभली आहे.कार्य उल्लेखनीयसात वर्षातच त्यांची पदोन्नती होऊन तकनिकी सुपरवायझर व पुढच्या तीन वर्षांत ज्युनिअर आॅफिसर म्हणून नियुक्ती झाली.तर लढाऊ टँकचे विशेष प्रशिक्षण प्राप्त असल्याने दयानंद यांची टँकसोबत लढणाऱ्या दस्त्यासोबत कायमची नियुक्ती केली होती. त्यांचे सैन्य दलातील कार्य उल्लेखनीय आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग