शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

यापुढे समाजकारणातून जनतेची सेवा करणार- दयानंद गवस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2018 2:07 PM

मी निवृत्त होत नसून आता फक्त माझी पोलिसातील नोकरी बदलत आहे. यापूर्वी पोलिसात काम करत होतो.

सावंतवाडी : मी निवृत्त होत नसून आता फक्त माझी पोलिसातील नोकरी बदलत आहे. यापूर्वी पोलिसात काम करत होतो. आता सामाजिक कार्यात कार्यरत असणार आहे. खाकी अंगावर आल्याने मला जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. या ३३ वर्षाच्या सेवेत अनेकांना न्याय देऊ शकलो हे माझे मी भाग्य समजतो, असे मत सावंतवाडीचे मावळते पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी व्यक्त केले. सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा माझ्या बालपणीच्या मित्रांसमवेत साजरा होतो याच्यासारखा आनंद कुठला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सावंतवाडीचे पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस हे शनिवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे सावंतवाडी पोलीस ठाण्याने एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर, पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, कुडाळ पोलीस निरीक्षक अविनाश भोसले, उद्योजक राजन आंगणे, नगरसेवक उदय नाईक, बाबा नाईक, व्यापारी संघाचे जगदीश मांजरेकर, सभापती आनंद नेवगी, प्रा. सुभाष गोवेकर, माजी कृषी अधिकारी काका परब, बाळ बोर्डेकर, बांद्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, पोलीस निरीक्षक विनित चौधरी आदी उपस्थित होते.यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, दयानंद गवस यांनी अधिकारी म्हणून चांगले काम केले आहे. त्याची पोचपावती त्यांच्या पुढील आयुष्यात मिळेल. त्यांनी आपण स्थानिक असलो तरी कुणावरही अन्याय करणार नाही ही भावना कायम ठेवून काम केले. त्यामुळेच ते यशस्वी अधिकारी होऊ शकले, असे मत यावेळी त्यांनी मांडले. त्यांनी आपल्या पुढील आयुष्यात राजकारणात यावे आणि काम करावे, असे आवाहनही साळगावकर यांनी यावेळी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत खांडेकर यांनी सेवानिवृत्ती ही खरोखरच अवघड असते. पण जी व्यक्ती नेहमी समाजासोबत काम करत असते, त्या व्यक्तीला कधीही याची उणीव भासत नाही. आता यापुढे गवस यांनीही समाजकारण तसेच स्पर्धा परीक्षांसाठी काम करावे, असे मत मांडले.पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस हे चांगलेच भावूक झाले होते. मी ३३ वर्षांपूर्वी सेवेत आलो, पण कधीही पोलीस सेवा वाईट म्हटली नाही. जे चांगले असेल ते स्वीकारत गेलो आणि काम केले. त्यामुळेच मला माझ्या बालपणीचे मित्रही सेवा निवृत्तीच्या काळात मिळाले, असे सांगत मुंबईत सेवा बजावत असताना अनेक प्रसंग आले. मुंबई कोणासाठी थांबत नाही हे आम्ही अनुभवले आणि हे अनुभवण्याचे भाग्यच पोलीस सेवेमुळे मिळाले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.मुंबई बॉम्बस्फोट तसेच १९९२ ची मुंबई दंगल आदी घटना मला पाहण्यास मिळाल्या हे मी माझे भाग्य समजतो. वाहतूक पोलीस म्हणूनही चांगले काम केले. माझ्यावर वाहतुकीबाबत अभ्यास करण्याची खास जबाबदारी सध्याचे पोलीस महासंचालक सतीष माथूर यांनी दिली होती आणि ते काम मी योग्य पध्दतीने केले असल्याचे गवस यांनी सांगितले. आतापर्यंत पोलिसांच्या माध्यमातून जनतेची सेवा केली. आता यापुढे फक्त माझी नोकरी बदलली. आता सामाजकारण ही माझी नोकरी असणार आहे. माणसाने कधीही शांत बसता नये. नेहमी काम करत रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी सर्वांना केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गवस व नाईक यांनी पोलीस उपअधीक्षक गवस यांचा सत्कार केला. तर पोलीस हेडकॉन्स्टेबल माया पवार यांनी यांच्या पत्नीचा सत्कार केला. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, माजी कृषी अधिकारी काका परब, जगदीश मांजरेकर, सुभाष गोवेकर, सतीश पाटणकर आदींनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश नाईक यांनी, आभार अभय वाखारे यांनी मांडले.