शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: गुरु पौर्णिमेच्या दिवशीच दत्तमूर्ती सापडली, जानवली येथील मंदिरातून गेलेली चोरीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:29 IST

कणकवली : जानवली कृष्णनगरी येथील श्री स्वयंभू दत्त मंदिरातून शनिवारी (दि.५) पहाटे चोरीस गेलेली श्री दत्तमूर्ती आज, गुरुवारी गुरु पौर्णिमेच्या ...

कणकवली : जानवली कृष्णनगरी येथील श्री स्वयंभू दत्त मंदिरातून शनिवारी (दि.५) पहाटे चोरीस गेलेली श्री दत्तमूर्ती आज, गुरुवारी गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सापडली. कृष्णानगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिशवीवर दत्तमूर्ती आढळून आली. कृष्णा नगरीच्या वॉचमनने याबाबत पोलिसांना माहिती देताच कणकवली पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत. पंचनामा करत मूर्ती ताब्यात घेण्यात आली. 

वाचा- चोरट्यांनी दत्त मंदिरातील मूर्तीच केली लंपास; सायरन वाजताच रिव्हॉल्वर, कटावणी टाकून पसार, सीसीटीव्हीत कैदआज, गुरुवारी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास हायवेवरून कृष्णानगरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉर्नरला एका पिशवीवर ठेवलेल्या स्थितीत ही मूर्ती वॉचमनला दिसून आली. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवताच कणकवलीचे पोलिस निरीक्षक अतुल जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ या तसेच फॉरेन्सिक अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मूर्तीची पाहणी केली व त्यानंतर पंचनामा करून मूर्ती ताब्यात घेण्यात आली आहे. दरम्यान ही मूर्ती या ठिकाणी कशी आणून ठेवण्यात आली, ती कोणत्या वाहनाने आणण्यात आली याबाबतचा तपास सुरू करण्यात आला होता.