शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

दापोलीत चौरंगी लढत रंगणार

By admin | Updated: October 2, 2014 00:12 IST

राष्ट्रवादीतील बंडखोर किशोर देसाई यांची मते ठरवणार विजयी उमेदवार

शिवाजी गोरे - दापोली विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, खरी लढत शिवसेनेचे विद्यमान आमदार सूर्यकांत दळवी विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांच्यात होणार आहे. तरीही भाजपाचे केदार साठे, काँग्रेसचे सुजित झिमण, कुणबी समाजाचे अपक्ष उमेदवार शशिकांत धाडवे, मनसेचे वैभव खेडेकर, राष्ट्रवादीचे बंडखोर किशोर देसाई यांच्यामुळे निवडणुकीला चांगली रंगत चढली आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा या चार मुख्य पक्षात चौरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादीच्या बंडखोर अपक्ष उमेदवारांची मते विजयी उमेदवारासाठी निर्णायक ठरणार आहेत.दापोली विधानसभा मतदारसंघ दापोली, खेड, मंडणगड या तीन तालुक्यांचा मिळून बनलेला आहे. या मतदार संघाला २००९च्या पुनर्रचनेत खेड तालुक्याचा काही भाग जोडला गेल्याने दापोली विधानसभा मतदार संघात चुरस वाढली. या मतदार संघात दापोली तालुक्यातील १७८ गावे, मंडणगडची ९०, तर खेडची ७० गावे जोडली गेल्याने या मतदार संघाचा भौगोलिक आकार बदलला. या मतदार संघात गेली २५ वर्षे शिवसेनेची निर्विवाद सत्ता आहे. शिवसेनेचे आमदार सूर्यकांत दळवी यांना राष्ट्रवादीचे संजय कदम यांनी जोरदार ठसन देत आमदार नसतानाही राज्यातील सत्तेच्या जोरावर विकासकामे करुन दाखविली. सूर्यकांत दळवी आमदार असताना जेवढा निधी आणू शकले नाहीत, त्याहीपेक्षा अधिक निधी तीनही तालुक्यात आणला. त्यामुळे काँग्रेस आघाडीचे भावी उमेदवार म्हणून संजय कदम यांचेच नाव सातत्याने पुढे आणले जाऊ लागले. राष्ट्रवादीने या मतदार संघाची मागणीही रेटवून धरली. असे असतानाच काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी तुटली. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून संजय कदम यांचे नाव पुढे आले. परंतु राष्ट्रवादीचे तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले किशोर देसाई यांनी बंड केल्याने अप्रत्यक्षपणे शिवसेनेचा फायदा होईल. तरीही गेल्या निवडणुकीत आमदार दळवी यांना ४८ हजारांचे मताधिक्य होते. यावेळी शिवसेनेबरोबर भाजपा नाही. कुणबी समाजाने स्वतंत्र अपक्ष उमेदवार शशिकांत धाडवे उभा केल्याने शिवसेनेबरोबर असलेला ४० टक्के समाज शिवसेनेबरोबर नाही. त्यामुळे यावेळी शिवसेनेला ही निवडणूक जिंकणे सोपे नाही. संजय कदम यांना किशोर देसार्इंच्या बंडखोरीचा कितपत तोटा होतो, यावर शिवसेनेचा पेपर सोपा होण्यास मदत होणार आहे.काँग्रेस - राष्ट्रवादी, अपक्ष किशोर देसाई यांच्यात मतांचे विभाजन झाल्यास शिवसेनेला फायदा होईल, असे वाटत असले तरीही कुणबी समाजाचे शशिकांत धाडवे, मनसेचे वैभव खेडेकर, भाजपाचे केदार साठे यांचा शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता असून, खरी लढत शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीचे बंडखोर किशोर देसाई यांनी आपला अर्ज मागे न घेतल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. १० वर्षांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडून अपक्ष म्हणून २० हजार मते घेऊन देसार्इंनी आपले अस्तित्व दाखवले होते. परंतु यावेळचा त्यांचा मतदारसंघावरचा दबदबा कायम आहे की नाही, हे येत्या निवडणुकीवरुन कळेल. आता निवडणुकीच्या रिंगणात १० उमेदवार आहेत आणि त्यांचे भवितव्य १९लाच समजेल.दापोलीएकूण मतदार २,६३,८८१ नाव पक्षसूर्यकांत दळवीशिवसेनाकेदार साठेभाजपशशिकांत धाडवेस्वाभिमान ब. संघआदम चौगुलेबहुजन मु. मोर्चावैभव खेडेकरमनसेसंजय कदमराष्ट्रवादीअ‍ॅड. सुजित झिमणकाँग्रेसकिशोर देसाईअपक्षदयानंद कांबळेबसपाप्रदीप गंगावणेअपक्ष