मत्स्य विभागाकडून नुकसानीची पाहणी, अधिकाऱ्यांनी केला पंचनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 13:50 IST2019-11-09T13:48:18+5:302019-11-09T13:50:16+5:30
क्यार वादळामुळे विजयदूर्ग भागातील मच्छिमारांच्या झालेल्या नुकसानीची मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला.

क्यार वादळामुळे विजयदुर्ग येथे नुकसान झालेल्या मच्छिमारांशी मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी प्रतिक महाडवाला यांनी चर्चा केली. यावेळी विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर, उत्तम बिर्जे आदी उपस्थित होते.
ठळक मुद्देमत्स्य विभागाकडून नुकसानीची पाहणीमत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी प्रतिक महाडवाला यांनी केला पंचनामा
देवगड : क्यार वादळामुळे विजयदूर्ग भागातील मच्छिमारांच्या झालेल्या नुकसानीची मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला.
क्यार वादळामुळे विजयदूर्ग भागातील मच्छिमारांचेही अतोनात नुकसान झाले.यामध्ये जाळी वाहून जाणे, जाळी तुटून जाणे यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले. मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी प्रतिक महाडवाला यांनी गुरूवारी विजयदूर्ग भागात जावून प्रत्यक्ष पाहणी करून मच्छिमारांच्या नुकसानीची माहिती घेतली.
यावेळी विजयदूर्ग सरपंच प्रसाद देवधर, उत्तम बिर्जे, रामेश्वर सरपंच विनोद सुके तसेच मच्छिमार उपस्थित होते.