शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

डी. एड, बी. एड बेरोजगारांना शाळांमध्ये सामावून घेण्याची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे करणार - नितेश राणे 

By सुधीर राणे | Updated: July 12, 2023 16:23 IST

कणकवली : डी. एड. व बी. एड. बेरोजगार उमेदवारांना जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षण सेवक म्हणून संधी देण्यात यावी, अशी मागणी ...

कणकवली : डी. एड. व बी. एड. बेरोजगार उमेदवारांना जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षण सेवक म्हणून संधी देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे, असे आश्वासन भाजपाचे युवा नेते तथा आमदार नितेश राणे यांनी दिले. निवृत्त शिक्षकांना शाळेत पुन्हा सामावून घेण्याच्या निर्णयात वयोमानानुसार काही अडचणी आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी जिल्ह्यातील उमेदवारांचा विचार व्हावा, असे आपले मत आहे. तसेच जिल्ह्यातील संबधित संघटनानी तशी मागणी केली आहे. त्यामुळे आपण त्या दृष्टीने पाठपुरावा करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.ते म्हणाले, शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांच्या रिक्त जागेवर निवृत्त शिक्षकांना घेण्यासंदर्भात  अध्यादेश राज्य शासनाकडून काढण्यात आला आहे. या आदेशाला जिल्ह्यातील बी.एड., डी.एड.बेरोजगार उमेदवारांच्या  संघटनानी विरोध केला आहे. तर दुसरीकडे काही शिक्षक हे वयोमानानुसार त्या ठिकाणी काम करू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे याबाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही राणे यांनी सांगितले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसTeacherशिक्षक