शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांची कणकवली रेल्वेस्थानकात गर्दी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 16:40 IST

Kankavli CoronaVirus RailwayStation Sindhdurg : रेल्वे स्थानकावर मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांची मोठी गर्दी होती. यावेळी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीकरिता येणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वे स्थानकातच आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे रॅपिड टेस्ट करण्यात आली. यामध्ये १५० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्देकणकवली रेल्वेस्थानकात चाकरमान्यांची गर्दी कायम रॅपिड टेस्ट किटचा तुटवडा, तपासणीत ४ रुग्ण पॉझिटिव्ह

कणकवली : रेल्वे स्थानकावर मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांची मोठी गर्दी होती. यावेळी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीकरिता येणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वे स्थानकातच आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे रॅपिड टेस्ट करण्यात आली. यामध्ये १५० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.कणकवली रेल्वे स्थानकात मुंबईहून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची रॅपिड टेस्ट केली जात होती. मात्र, मंगळवारी रॅपिड टेस्टच्या किटचा तुटवडा निर्माण झाल्याने या प्रवाशांपैकी कोणी संशयित आढळल्यास त्याची आरोग्य विभागाच्या पथकाकडून रॅपिड टेस्ट करण्यात येत होती. तसेच इतर प्रवाशांची फक्त थर्मल गनने टेंपरेचर व ऑक्सिमीटरने ऑक्सिजन तपासणी करून रजिस्टरला नोंदी करण्यात आल्या आहेत.पटवर्धन चौकातही टेस्ट किटचा तुटवडाकणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात थर्मल स्क्रिनिंगमध्ये सातत्य ठेवण्यात आले असून, कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ त्या व्यक्तीची रॅपिड टेस्टही केली जात आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या वतीने पुरविण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट किटपैकी काही किट शिल्लक असून, बुधवारपर्यंत या टेस्ट किटचा तुटवडा निर्माण होणार आहे. त्यामुळे रॅपिड टेस्ट करण्यासाठी आणखी किट तत्काळ उपलब्ध करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग