शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुट्ट्या संपल्या; पाऊले चालती परतीची वाट; सर्वच रेल्वे स्थानकांवर मुंबईकरांची तुफान गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 16:56 IST

आता परतीसाठीही हाउसफुल्ल गर्दी

कणकवली : गणेशोत्सवासाठी गावी दाखल झालेले मुंबईकर दीड, पाच दिवसांनी गणेश मूर्तींचे विसर्जन करून मुंबईला परतीच्या प्रवासाला लागले आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही हजारोंच्या संख्येने मुंबईकर गणेशभक्त गणेशोत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी दाखल झाले आहेत. गणेशोत्सव साजरा करून ते मुंबईला परतू लागले आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसत आहे. मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या तुडुंब भरून धावू लागल्या आहेत.मुंबईकराना परतीच्या प्रवासासाठी कोकण रेल्वेसह एसटी प्रशासनाकडून ज्यादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशभक्तांची चांगली सोय झाली, तर दुसरीकडे सुट्ट्यांचे नियोजन करून, अजूनही मुंबईकर गावी दाखल होत आहेत.उत्साह शिगेलासिंधुदुर्गासह तळकोकणात गणेशोत्सवाचा माहोल सुरू असून, उत्साह शिगेला पोहोचला आहे. या गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे व अन्य भागात नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले कोकणवासीय आपल्या मूळ गावी दाखल झाले आहेत. लाखोंच्या संख्येने गणेशभक्त जिल्ह्यात दाखल झाले आहेत.प्रसंगी जनरल बोगीतून प्रवास करून गावीगावी येताना काही ज्यादा गाड्या सोडण्यात आल्याने मोठ्या संख्येने रेल्वे गाड्या कोकण रेल्वे मार्गावरून धावत होत्या. परिणामी, अनेक गाड्या उशिराने धावत होत्या. त्यातच कन्फर्म तिकिटे न मिळालेल्या मुंबईकरांनी जनरल बोगीतून प्रवास करण्यासाठी एक एक दिवस अगोदर दादर, ठाणे आदी रेल्वे स्थानकांत रांगा लावल्या होत्या. त्यानंतर, अनेक तासांचा प्रवास करून मुंबईकर गावी दाखल झाले होते. आता गर्दी गाड्यांमध्ये पाहायला मिळत आहे.आता दुसऱ्या टप्प्यातील मुंबईकरांचे आगमनटप्प्याटप्प्याने मुंबईकर परतत आहेत. खासगी वाहने घेऊन आलेले मुंबईकर परतीच्या प्रवासाला लागल्याने, महामार्गावरही गाड्यांची मोठी वर्दळ दिसून येत आहे. खासगी आराम बसेसचे बुकिंगही फुल्ल झाले असून, तिकिटांचे दरही वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अकरा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करून काही जण परतणार आहेत, तर पहिल्या पाच दिवसांत सुट्टी न मिळालेले मुंबईकर अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सवासाठी येत राहणार आहेत.आता परतीसाठीही हाउसफुल्ल गर्दीपाच दिवसांच्या गणरायांना निरोप देऊन ते परतीच्या प्रवासाला लागले आहेत. यामुळे कुडाळ, सावंतवाडी, सिंधुदुर्ग, कणकवली आदी प्रमुख रेल्वे स्थानकांवर मुंबईला परतणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी दिसत आहे. सर्वच गाड्यांचे तिकीट आरक्षण आधीच फुल्ल झाले आहे. जनरल बोगीतही हाउसफुल्ल गर्दी होत आहे.