gram panchayat election: अर्ज दाखल करण्यासाठी कणकवलीत उमेदवारांची मोठी गर्दी
By सुधीर राणे | Updated: December 2, 2022 13:54 IST2022-12-02T13:52:43+5:302022-12-02T13:54:23+5:30
तहसीलदार रमेश पवार यांनी प्रत्येक गावात अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी नेमत गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली आहे.

gram panchayat election: अर्ज दाखल करण्यासाठी कणकवलीत उमेदवारांची मोठी गर्दी
कणकवली : कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. यामुळे उमेदवारांनी सकाळी ९ वाजल्यापासूनच नामनिर्देशन दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी केली आहे. सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नामनिर्देशन दाखल करून घेण्यात येणार आहेत.
तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतसाठी सरपंच व सदस्य यांचे अंदाजे ६० टक्के नामनिर्देशन पत्र आज दाखल होण्याची शक्यता आहे. तहसीलदार रमेश पवार यांनी प्रत्येक गावात अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी नेमत गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली आहे.
काल, गुरुवारी चौथ्या दिवशी सरपंच पदासाठी ४३ तर सदस्यपदासाठी २३६ असे एकूण २७९ जणांची नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. तालुक्यात आतापर्यंत एकूण ४३९ जणांची नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.